Thursday, February 5, 2026
HomeनाशिकNashik News : एचएसआरपी नंबर प्लेट बसविणे बंधनकारक

Nashik News : एचएसआरपी नंबर प्लेट बसविणे बंधनकारक

नाशिक | Nashik

वाहनांच्या (Vehicles) नंबर प्लेटमध्ये छेडछाड व बनावटगिरी करून होणारे गुन्हे कमी करणे, रस्त्यांवर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटविणे व राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट (HSRP) बसविणे आवश्यक आहे. त्यानुसार परिवहन विभागाच्या (RTO) २३ डिसेंबर २०२४ रोजी परिपत्रकानुसार जिल्ह्यातील १ एप्रिल २०१९ पूर्वी उत्पादित वाहनांच्या वाहनधारकांनी ३१ मार्च २०२५ पूर्वी आपल्या वाहनाची एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्याची कार्यवाही करावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी, नाशिक यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

- Advertisement -

वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्यासाठी नाशिक जिल्ह्यासाठी (Nashik District) M/s. FTA HSRO solutions pvt. Ltd ही एजन्सी व http://maharashtrahsrp.com हे संकेतस्थळ निश्चित करण्यात आले आहे. वाहनधारकांनी या संकेतस्थळावर नोंदणी करून सोयीप्रमाणे वेळ घेवून नंबर प्लेट बसवून घ्यावी. वाहनधारक नाशिक कार्यालयातील नोंदणी धारक जरी नसला व कामासाठी वाहन जिल्ह्यात वापरत असेल तरीही वाहनास एचएसआरपी नंबर प्लेट बसविणे आवश्यक आहे. एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्यासाठी जीएसटी वगळता दुचाकी/ ट्रॅक्टर धारकांना रूपये ४५०, तीन चाकी वाहनांना रूपये ५०० व इतर सर्व वाहनांना ७४५ रुपये इतके शुल्क निश्चित केले आहे.

YouTube video player

दरम्यान, वाहनवार एचएसआरपी नंबर प्लेट न बसविल्यास वाहनाचे मालकी हस्तांतरण, पत्ता बदल, वित्त बोजा चढविणे/ उतरविणे, दुय्यम प्रत, विमा अद्यावत करणे इत्यादी कामकाज थांबविण्यात येणार आहे. याबाबत काही अडचण अथवा तक्रार असल्यास संबंधित सेवापुरवठा धारकांच्या पोर्टलवर तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालय (Regional Transport Office) नाशिक (Nashik) येथे तक्रार दाखल करावी, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

Nashik MC Politics : भाजप विरोधकांची बेरीज पन्नास तरीही महापौर पदाच्या...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik नाशिक महानगरपालिकेत (Nashik NMC) स्पष्ट बहुमत असलेल्या भाजपने महापौरपदासाठी हिमगौरी आहेर-आडके यांचे नाव निश्चित केल्याने त्यांचा विजय जवळपास निश्चित मानला...