Tuesday, October 6, 2026
HomeनाशिकNashik Temperature News : ऑक्टोबर हिटचा तडाखा; पुढील आठवड्यात तापमान आणखी वाढण्याची...

Nashik Temperature News : ऑक्टोबर हिटचा तडाखा; पुढील आठवड्यात तापमान आणखी वाढण्याची शक्यता

तापमान ३५ अंशांवर

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच नाशिक शहरात उन्हाचा तडाखा जाणवू लागला असून, रविवारी (दि. ४) कमाल तापमानाचा पारा थेट ३५ अंश सेल्सिअसवर पोहोचला. गुरुवारी ३४.८ अंशांवर असलेल्या तापमानात रविवारी आणखी वाढ झाली. त्यामुळे दिवसभर उष्णतेच्या झळांनी नाशिककर हैराण झाले आहेत. रात्रीही उकाडा जाणवत असल्याने नागरिकांना ‘ऑक्टोबर हिट’चा चटका अधिक तीव्रतेने अनुभवावा लागत आहे. कमाल तापमान ३५ अंशादरम्यान नोंदले जात आहे.

- Advertisement -

ऑक्टोबर महिना सुरू होताच गुरुवारी किमान तापमान २०.५ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. रविवारी मात्र त्यात घसरण होऊन ते १७,४ अंश नोंदले गेले. सकाळी आणि सायंकाळी वातावरणातील आर्द्रतेचे प्रमाण कमी झाल्याने उष्णतेची तीव्रता अधिक जाणवत होती. २ व ३ ऑक्टोबरची शासकीय सुट्टी असल्याने दुपारच्या वेळी शहरातील प्रमुख रस्त्यांवरील वर्दळही तुलनेने कमी होती. उन्हाचा पारा वाढल्याने शहरातील हातगाड्या व स्टॉलवरील अननस, अन्य फळे, शीतपेय तसेच फळांच्या रसाला मागणी वाढली आहे. दुसरीकडे, मोठ्या व्यावसायिक दालनांमध्ये वातानुकूलित यंत्रणा, पंखे आणि कुलरचा वापर पुन्हा वाढला आहे.

परतीचा पाऊस कमी, उष्णता वाढली

यंदाच्या पावसाळ्यात तुलनेने कमी झालेले पर्जन्यमान आणि परतीच्या पावसानेही ओढ दिल्याने ऑक्टोबरच्या प्रारंभीच तापमान वाढल्याचे चित्र आहे. पुढील काही दिवस उष्ण वातावरण कायम राहण्याची शक्यता असून, आठवड्याच्या अखेरीस तापमानात काहीशी घट होऊ शकते. मात्र, त्यानंतरच्या आठवड्यात पुन्हा तापमानाचा पारा वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. ऑक्टोबरअखेरपर्यंत तापमानात चढ-उतार कायम राहण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्या

Nashik News : मुंबईसारख्या महानगरांमध्ये ‘आदिवासी एम्पोरिअम’ उभारा; आढावा बैठकीत...

0
नाशिक | Nashik आदिवासी बांधवांची (Tribal ) समृद्ध, वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती आणि परंपरा खऱ्या अर्थाने जगाच्या नकाशावर पोहोचवण्यासाठी मुंबईसारख्या आंतरराष्ट्रीय शहरांमध्ये भव्य 'आदिवासी एम्पोरिअम' उभारण्यात यावे,...