नाशिक | प्रतिनिधी | Nashik
शहर पोलिसांच्या वाहतूक शाखेने (City Police Traffic Branch) सन २०२४ मध्ये विविध ठिकाणी दंडात्मक कारवाई (Action) करून तब्बल अकरा कोटी ४७ लाखांचा दंड ठोठवला आहे. मात्र, त्यापैकी केवळ १ कोटी ४८ लाखांची दंड आकारणी झाली आहे. उर्वरित वाहनचालकांनी दंड न भरल्याने त्यासंदर्भात न्यायालयात माहिती देण्यात आली असून सन २०२३ च्या तुलनेत कारवाईत घट होऊनही दंडाची रक्कम अधिक असल्याने गंभीर स्वरुपाच्या कारवायांवर पोलिसांनी भर दिल्याचे दिसते.
शहरातील वाहतुकीचा (Traffic) बोजवारा उडाल्याने नागरिक त्रस्त असताना दीडलाख बेशिस्त वाहन चालकांना सन २०२४ मध्ये तब्बल अकरा कोटी रुपयांचा दंड वाहतूक पोलिसांनी (Police) ठोठविला. विशेष म्हणजे, सन २०२३ च्या तुलनेत हेल्मेट कारवाईत सन २०२४ मध्ये निम्म्याने घट झाली असून, एकूण कारवाईतही एक लाखाने घट झाली आहे. परंतु, ट्रिपलसीट, नो पार्किंग,काळी काच व इतर कारवाईत वाढ झाल्याने सन २०२३ च्या तुलनेत दुप्पट दंड सन २०२४ मध्ये ठोठविण्यात आल्याची वाहतूक पोलिसांची नोंद आहे.
दरम्यान, शहरातील प्रत्येक चौकात वाहनांच्या रांगा लागत असून, मुंबई-आग्रा महामार्गांसह (Mumbai-Agra Highways) उपनगरातील सर्वच रस्त्यांवर होणाऱ्या कोंडीमुळे नागरिक ऋत झाले आहेत.पोलिस व महापालिका कोंडी फोडण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. सन २०२५ मध्ये शहरातील वाहतूक सुरक्षेसाठी पोलीस प्रयत्न करणार आहेत. तर, महापालिके नेही त्यासंदर्भात तयारी सुरू केली आहे. मात्र, त्यावर कारवाई सुरु झाली नसून ती लवकरात लवकर व्हावी, असे नाशिककरांना अपेक्षित आहे.
मग सोळाव्या दिवशी कोर्टकचेरी
राज्यात ई-चलान ठोठावल्यावर ऑनलाइन अथवा रोख स्वरूपात वाहतूक पोलिसांकडे पैसे जमा करण्याची सुविधा आहे. जेव्हा पोलीस चालकांना अडवितात, तेव्हा थकीत दंड ई-चलान सिस्टीमद्वारे जाणून घेतात. थकीत दंड भरण्यास सांगितल्यावरही नागरिक नकार देतात. त्यांच्यावर ‘पेंडिंग’ कारवाई केली जाते. दरम्यान, एनआयसी संलग्न ई-चलानमुळे नाशिक शहरात एखादे ई-चलान पंधरा दिवसांत न भरल्यास त्याची माहिती पोलिसांमार्फत ई- स्वरूपात कोर्टात दिली जाते. तेथे लोकअदालतीपूर्वी मोटार वाहन न्यायालयातून संबंधित चालकांना समन्स काढण्यात येते.
मुद्दे
सन २०२३ मध्ये ६ कोटी ६ लाख ४० हजार ५० रुपये दंड
सन २०२४ मध्ये ११ कोटी ४७ लाख ६३ हजार ८५२ रुपये दंड
हेल्मेट कारवाईत सन २०२३ च्या तुलनेत ४६ हजार १५४ ने घट
ट्रिपलसीट, नो पार्किंग, काळी काच, नो पार्किंग, मोबाइल कारवाईत वाढ
दंड वसूल : १ कोटी ४८ लाख ४७ हजार ९०१ रुपये
दंड भरणारे २१ हजार ७०९ चालक
दंड थकीत : १० कोटी २३ लाख ७६ हजार चारशे रुपये
दंड थकवणारे १ लाख ४७ हजार ३५३ चालक
प्रकार | सन-२०२३ | सन-२०२४ |
विनाहेल्मेट | ९४,९३० | ४८,७७६ |
विनासीट बेल्ट | १४,०३६ | १२,८६९ |
ट्रिपल सीट | ५,१९६ | ६,९१५ |
नो पार्किंग | १२,०३६ | १४,८०० |
काळी काच | १,५४३ | २,५०४ |
नो एन्ट्री | १४,५६० | २७,५६५ |
सिग्नल मोडणे | २७,९३० | २३,६८८ |
मोबाईल वापर | ८२१ | ९१४ |
झेब्रा क्रॉसिंग | ७३८ | १५० |
इतर | ७५,०७१ | २३,६६१ |
एकूण | २,४६,८६१ | १,६६, ४४३ |