Wednesday, July 22, 2026
Homeनाशिक​Nashik News : भावली धरणाला पोलिसांचा वेढा; हुल्लडबाजांना खाकीचा प्रसाद

​Nashik News : भावली धरणाला पोलिसांचा वेढा; हुल्लडबाजांना खाकीचा प्रसाद

​नाशिक | प्रतिनिधी | Nashik

जुलै महिन्याच्या गुलाबी थंडीत आणि पावसात पर्यटकांना भुरळ घालणारे इगतपुरीतील निसर्गरम्य भावली धरण सध्या पोलीस बंदोबस्ताने वेढले गेले आहे. गेल्या रविवारी (दि. १२) नाशिकरोड (Nashik Road) येथील एका पर्यटक (Tourist) कुटुंबासोबत घडलेल्या विनयभंग, दरोडा आणि खुनाच्या प्रयत्नाच्या घटनेनंतर ग्रामीण पोलीस पूर्णपणे ‘ॲक्शन मोड’वर आले आहेत. पोलिसांच्या या भूमिकेमुळे आणि नुकत्याच घडलेल्या या गंभीर घटनेच्या भीतीमुळे रविवारी (दि. १९) भावली धरणावर पर्यटकांची गर्दी रोडावल्याचे पाहायला मिळाले.

- Advertisement -

​पर्यटकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी आणि अपर पोलीस अधीक्षक विमला एम. यांच्या आदेशाने इगतपुरी पोलिसांनी सुटीच्या दिवशी भावली धरणासह तालुक्यातील इतर गर्दीच्या पर्यटन स्थळांवर २४ तास गस्त व नाकेबंदी केली आहे. ​रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने इगतपुरीचे पोलीस निरीक्षक श्याम बलप आणि अमलदारांचे पथक भावली धरणाच्या (Dam) मुख्य मार्गावर आणि परिसरात तैनात होते. पोलिसांनी धरणाकडे जाणाऱ्या मार्गावर ‘फिक्स पॉईंट’ उभारून प्रत्येक संशयास्पद वाहनाची कसून तपासणी केली.

हुल्लडबाजांना दंडुक्याचा प्रसाद

​पर्यटन स्थळांसह रस्त्यावर मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा घालणाऱ्या आणि महिलांची छेड काढणाऱ्या हुल्लडबाजांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. शांतता भंग करणाऱ्या काही तरुणांना पोलिसांनी दंडुक्याचा ‘प्रसाद’ देत सक्त ताकीद दिली. पोलिसांच्या या पवित्र्यामुळे रविवारी धरणावर कोणतीही अनुचित घटना घडली नाही. मात्र, गेल्या आठवड्यातील घटनेच्या पार्श्वभूमीवर, निसर्गाचा आनंद घेण्यासाठी दरवर्षी गर्दी करणाऱ्या पर्यटकांचा ओढा या रविवारी घटल्याचे प्रकर्षाने जाणवले.

​१२ संशयित गजाआड

नाशिकरोड येथील कुटुंबावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी इगतपुरी पोलिसांनी एकूण १२ संशयितांना बेड्या ठोकल्या आहेत. न्यायालयाने सर्व संशयितांची रवानगी सध्या न्यायालयीन कोठडीत केली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

संपर्क करा

 भावलीसह जिल्ह्यातील सर्वच पर्यटन स्थळांवर पाेलीस ठाणेनिहाय गस्त व बंदाेबस्त तैनात आहे. संबंधित प्रभारी अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात विशेष गस्त सुरु असून, नागरिकांनी कोणत्याही भीतीशिवाय पर्यटनाचा आनंद घ्यावा आणि आपत्कालीन स्थितीत ‘डायल ११२’ वर संपर्क साधावा.

  • डाॅ. डी. एस. स्वामी, पाेलीस अधिक्षक, नाशिक

महत्त्वाचे मुद्दे

  • भावली धरणावर पोलिसांचा बंदोबस्त
    हुल्लडबाजांना पोलिसांचा ‘प्रसाद’
    ​संशयास्पद वाहनांची जागेवरच कसून तपासणी
    गंभीर घटनेनंतर पर्यटकांची संख्या रोडावली
    ​पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पोलीस ‘ॲक्शन मोड’वर

ताज्या बातम्या

Rahata : भावली ओव्हरफ्लो, दारणात 70 टक्के पाणी

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata नाशिक जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोटात हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचे आगमन अधूनमधून होत आहे. इगतपुरी तालुक्यातील भावली तुडूंब भरले. या धरणाच्या सांडव्यावरुन...