Monday, September 28, 2026
HomeनाशिकNashik Leopard News : पिंपळगाव खांब येथे तिसरा बिबट्या जेरबंद

Nashik Leopard News : पिंपळगाव खांब येथे तिसरा बिबट्या जेरबंद

नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik Road

वडनेर दुमाला (Wadner Dumala) येथील आयुष भगत या चार वर्षाच्या बालकावर रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला बिबट्याने (Leopard) हल्ला केला होता. या हल्ल्यात त्याचा मृत्यू (Death) झाला होता. या घटनेनंतर वनाविभागाविरोधात परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त करत बिबट्याला जेरबंद करण्यासाठी माजी नगरसेवक केशव पोरजे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढला होता.

- Advertisement -

या मोर्चानंतर वनविभागाने (Forest Department) वडनेर दुमाला परिसर व पिंपळगाव खांब या भागात तब्बल १५ पिंजरे लावले होते. मागील आठवड्यात दोन बिबटे जेरबंद झाले होते. त्यानंतर आता आठ दिवसाच्या कालावधीतच सोमवारी मध्यरात्री पिंपळगाव खांब येथील फिल्टर प्लांट परिसरात लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात (Cage) तिसरा बिबट्या जेरबंद झाला आहे.

दरम्यान, हा बिबट्या जेरबंद झाल्याचे समजताच माजी नगरसेवक केशव पोरजे, जगदीश पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर ही माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना कळविली. त्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सदरच्या बिबट्याला म्हसरूळ येथे नेण्यात आले. हा बिबट्या पकडण्यात आल्यानंतर त्याला बघण्यासाठी नागरिकांनी (Citizen) मोठी गर्दी केली होती.

ताज्या बातम्या

शरद

Sharad Pawar NCP: आपण कुठेही जाणार नाही, यायचं असेल तर आमच्यासोबत...

0
मुंबई | Mumbaiराज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलिनीकरणाचा मुद्दा गेल्या काही काळापासून चर्चेत आहे. मात्र, आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष...