Friday, April 25, 2025
HomeनाशिकNashik News : एचएएलमध्ये होणार १३ हजार कोटींची लढाऊ विमाननिर्मिती

Nashik News : एचएएलमध्ये होणार १३ हजार कोटींची लढाऊ विमाननिर्मिती

सुखोई निर्मितीमुळे नाशिकच्या उद्योजकांना नवीन संधी : बेळे

नाशिक | Nashik

निमा इंडेक्स २०२४ मध्ये निमाने एचएएलला (HAL) मागणी केली आणि लगेचच इंडेक्स संपल्यानंतर एचएएलला १३ हजार कोटी रुपयांच सुखोई लढावू विमान (Sukhoi Fighter Jet) निर्मितीचे काम मिळाले, हे या प्रदर्शनाचे चांगले फलितच म्हणावे लागेल. यामुळे नाशिकच्या औद्योगिक विकासाला चालना तर मिळेलच, परंतु त्याचबरोबर स्थानिक उद्योजकांना मोठ्या प्रमाणावर काम मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे, असे प्रतिपादन निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांनी केले.

- Advertisement -

एचएएलला सुखोई लढावू विमान निर्मितीचे काम मिळाल्याने एचएएलबरोबरच नाशिकच्या (Nashik) उद्योजक आनंद व्यक्त करीत आहेत. नाशिकचे उद्योजक गेल्या अपेक्षा करीत होते, त्याची पूर्तता या निमित्ताने होणार आहे, असे धनंजय बेळे यांनी पुढे नमूद केले. एचएएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी साकेत चतुर्वेदी तसेच महाव्यवस्थापक सुब्रतो मंडल यांनी निमा इंडेक्स प्रदर्शनात एचएएनचे दोन ते तीन नवीन प्रकल्प नाशकात येणार असल्याचे सूतोवाच केले होते. त्यासाठी नाशिकच्या उद्योजकांचे सहकार्य लागणार असल्याचेही सांगितले होते.

भारत सरकारने (India Government) मेक इन इंडियाचा नारा नुकताच दिला आहे. एचएएलला सुखोई ई विमान निर्मितीचे मिळालेले काम म्हणजे एकप्रकारे स्वदेशी बनावटीच्या उत्पादन निर्मितीकडे वाटचाल असल्याचे महटले तर ते वावगे ठरणार नाही. नाशिकच्या जास्तीत जास्त उद्योजकांना यात वेंडरशिप मिळावी, यादृष्टीने निमातर्फे दर महिन्याला एचएएलचे अधिकारी आणि उद्योजक यांच्यात समन्वयाची बैठक घडवण्याचे उद्दीष्ट धनंजय बेळे यांनी स्पष्ट केले. दख्यान देशाच्या संरक्षणात काम करणाऱ्या सुखोईच्या उत्पादनासाठी नाशिक एचएएलची निवड केल्याबद्दल निमा अध्यक्ष धनंजय बेठे, सरचिटणीस निखिल पांचाळ, आशिष नहार, राजेंद्र बडनेरे, मनीष रावल, हेमंत खॉड आदींसह पदाधिकान्यांनी एचएएलचे मुख्य व्ार्यकारी अधिकारी साकेत चतुर्वेदी यांचे अभिनंदन केले.

संरक्षण विभागाचे उद्दिष्ट

प्रत्यक्षात १५ सप्टेंबर रोजी संरक्षण मंत्रालयाकडून सुखोईचे भारतात उत्पादन करण्याला मंजुरी मिळाली होती. हवाई क्षेत्र अधिक सुरक्षित करण्यासाठी १२ सु ३० एमकेआय विमानांच्या खरेदीलाही संरक्षण मंत्रालयाने १५ सप्टेंबर रोजी मंजुरी दिली होती. भारतीय-स्वदेशी डिझाइन केलेले, विकसित आणि उत्पादित (आयडीएमएम)-बाय (भारतीय) श्रेणी अंतर्गत सर्व खरेदी भारतीय विखेत्यांकडून करण्याचेही निश्चित करण्यात आले होते. त्यामुळे आत्मनिर्भर भारतचे ध्येय साध्य होऊ शकते. त्या माध्यमातून भारतीय संरक्षणासाठी योगदानासह भारतीय उद्योगांना भरीव चालना मिळणार असल्याचे उद्दिष्ट यात ठेवण्यात आले होते. त्यातून भारतीय विमानांना जगाच्या पाठीवर विक्री करण्याची क्षमताही भविष्यात वाढवता येणार असल्याचे संरक्षण विभागाचे उद्दिष्ट आहे.

संरक्षण मंत्रालय १२ सुखोई विमाने खरेदी करणार

हवाई क्षेत्र अधिक सुरक्षित करण्यासाठी संरक्षण मंत्रालय १२ सुखोई विमाने खरेदी करणार आहे. यासाठी प्रमुख सरकारी कंपनी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) सोबत १३,५०० कोटी रुपयांचा करार करण्यात आला आहे. एचएएलच्या नाशिक विभागात या विमानांची निर्मिती केली जाणार आहे. सुखोई-३० मुळे भारतीय हवाई दलाच्या सुरक्षा ताफ्यात आणखी वाढ होणार आहे विमानात ६२.६ टक्के स्वदेशी सामग्रीचे असेल, जीभारतीय संरक्षण उद्योगाद्वारे उत्पादित केलेल्या अनेक घटकांच्या स्वदेशीकरणामुळे बाढली आहे. एचएएलच्या नाशिक विभागात या विमानांची निर्मिती केली जाणार आहे. या विमानांच्या पुरवठ्यामुळे भारतीय हवाई दलाची परिचालन क्षमता वाढेल आणि देशाची संरक्षण साता मजबूत होईल.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अजित

Ajit Pawar: अजित दादांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’...

0
पुणे | Pune मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुस्तक लिहायला सांगणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात राज्य कुटुंब कल्याण भवन...