Saturday, October 3, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik News : नाशिकला मिळाले नवे पोलीस उपायुक्त; 'यांची' झाली नियुक्ती

Nashik News : नाशिकला मिळाले नवे पोलीस उपायुक्त; ‘यांची’ झाली नियुक्ती

खांडवी, बच्छाव, चव्हाण, वालावलकर यांची बदली

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

कार्यकाळ पूर्ण केलेल्या भारतीय पोलीस सेवेसह राज्य पोलीस सेवेतील (State Police Force) ५१ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश राज्य गृहविभागाने शुक्रवारी (दि. २७) जारी केले. यात नाशिकला (Nashik) पाच नवे अधिकारी मिळाले असून शहर पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी, प्रशांत बच्छाव व गीता चव्हाण यांची बदली झाली आहे.

- Advertisement -

दरम्यान, नाशिक परिक्षेत्रासह (Nashik Zone) पोलीस आयुक्तालय व पाचही जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील उर्वरित बदल्या बाकी असून महिनाअखेरीस सर्व ठिकाणी नवे पोलीस अधीक्षक, अपर अधीक्षक, पोलीस उपायुक्त हजर होणार आहेत.

तांगडे एसीबीचे अधीक्षक

ठाणे ग्रामीण (Thane Rural) येथून भारत तांगडे यांची नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक (एसीबी) विभागात अधीक्षकपदी नियुक्ती झाली आहे. आगामी सिंहस्थाच्या दृष्टिकोनातून शहरातील पोलीस उपायुक्त पदांवर कोणाची वर्णी लागणार, याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नजरा होत्या. त्यानुसार मुख्यमंत्री सुरक्षा विभागाचे अधीक्षक योगेश चव्हाण व धुळे येथील अपर अधीक्षक किशोर काळे नियुक्त झाले आहेत. दोघांमध्ये आता मुख्यालय आणि गुन्हे विभागाची जबाबदारी कोणावर सोपवली जाणार याकडे नाशिक आयुक्तालयाचे लक्ष आहे. परिमंडळ एकचे उपायुक्त किरणकुमार चव्हाण व दोनच्या उपायुक्त मोनिका राऊत यांच्या बदलीचे आदेश निर्गमित झालेले नाहीत.

नाशिकला मिळाले हे नवे अधिकारी

नाव कुठून कुठे
प्रशांत खैरे अप्पर अधीक्षक, अहिल्यानगर एनपीए, नाशिक
चंद्रकांत खांडवी उपयुक्त नाशिक पोलीस अधीक्षक प्रोप्रके, धुळे
अनिकेत भारती प्रतीक्षेत उपायुक्त, राज्य गुप्तवार्ता नाशिक
किशोर काळे अप्पर अधीक्षक धुळे पोलीस उपायुक्त नाशिक शहर
गीता चव्हाण राज्य गुप्तवार्ता उपायुक्त पोलीस अधीक्षक एमपीए
योगेश चव्हाण पोलीस अधीक्षक मुख्यमंत्री सुरक्षा उपायुक्त, नाशिक शहर
प्रशांत बच्छाव उपयुक्त नाशिक पो. अधीक्षक कोल्हापूर नागरी हक्क
शर्मिष्ठा घारगे अधीक्षक एसीबी नाशिक पोलीस उपयुक्त छत्रपती संभाजीनगर

ताज्या बातम्या

इन्व्हेस्ट

‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’! १० लाख कोटींच्या गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार

0
मुंबई प्रतिनिधीमहाराष्ट्राला देशातील अग्रगण्य औद्योगिक राज्य आणि देशाच्या औद्योगिक विकासाचे प्रमुख केंद्र बनविण्याच्या दिशेने ‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’ हा महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून...