नाशिक | प्रतिनिधी | Nashik
आग्राराेडवरील अमृतधाम भागात (Amrut Dham) राहणाऱ्या तरुणीसह वेगवेगळ्या परिसरातील दाेघांनी आत्महत्या (Suicides) करुन जीवन संपविले. यातील दाेन महिलांसह एका पुरुषाच्या आत्महत्यांचे कारण स्पष्ट झाले नसून शहरातील पाेलीस ठाण्यांत (Police Station) आकस्मिक मृत्यूच्या नाेंदी दाखल करण्यात आल्या आहेत.
स्वाती सुनील बनकर (वय २७, रा. गुरुकृपा क्लिनिक, कैलासनगर, आग्राराेड, अमृतधाम) यांनी रविवारी(दि. २) दुपारी बारा वाजेपूर्वी बेडरुममध्ये ओढणीने गळफास घेतला. ही घटना कळताच स्वाती यांचा भाऊ भूषण याने उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले. मात्र, डाॅक्टरांनी तपासून मृत घाेषित केले. आडगाव पाेलीस ठाण्यात (Adgaon Police Station) घटनेची नाेंद करण्यात आली असून तपास हवालदार राजुळे करत आहेत.
तर, दुसऱ्या घटनेत मीनल दीपक निकम (वय ४२, रा. सिद्धी साेसायटी, श्रमिकनगर, सातपूर) यांनी रविवारी (दि. २) दुपारी चार वाजेपूर्वी काहीतरी कारणातून साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांची मुलगी कावेरी हिने रुग्णालयात (Hospital) दाखल केले असता, डाॅक्टरांनी मृत घाेषित केले. तपास सहायक उपनिरीक्षक गणेश पाटील करत आहेत. तर, तिसऱ्या घटनेत विनाेद दुखीराम निषाद (वय ४७, रा. साई अपार्टमेंटमागे, गणेश चाैक, चुंचाळे, अंबड) यांनी रविवारी(दि. २) संजीवनगर भाजीमार्केटच्या बाजूस असलेल्या झाडास दाेरी बांधून गळफास घेतला. मुलगा राहुल याने उपचारार्थ दाखल केले असता तपासून मृत घाेषित करण्यात आले. अंबड पाेलीस ठाण्याचे (Ambad Police Station) हवालदार पठाण तपास करत आहेत.