Tuesday, March 25, 2025
Homeक्राईमNashik News : तीन दिवस बंदोबस्ताचे; रॅश ड्रायव्हिंग, मद्यपींची धरपकड सुरु

Nashik News : तीन दिवस बंदोबस्ताचे; रॅश ड्रायव्हिंग, मद्यपींची धरपकड सुरु

रॅश ड्रायव्हिंग, मद्यपींची धरपकड सुरु

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नववर्षाच्या (New Year) दमदार स्वागतासाठी अवघे ४८ तास बाकी राहिले आहेत. त्यामुळे सरत्या वर्षाला गूडबाय आणि नववर्षाचे वेलकम करण्यासाठी सज्ज असलेल्या शहरातील (City) तळीरामांना आवर घालत धडक कारवाईसाठी नाशिक पोलीसही सज्ज झाले आहेत. शनिवारपासून (दि. २८) शहरात नाकाबंदी करुन तळीरामांवर कारवाई सुरू झाली आहे. आज, उद्या व मंगळवारी (दि. ३०) ठिकाठिकाणी पोलिसांनी (Police) बंदोबस्त नेमण्याचे नियोजन पूर्ण झाले आहे. त्यानुसार बेशिस्त चालक, हुल्लडबाजी करणाऱ्यांसह मद्यपींची धरपकड होणार आहे.

- Advertisement -

३१ डिसेंबर मंगळवारी असल्याने १ डिसेंबर रोजी बुधवारी किंवा २८ व २९ डिसेंबर रोजी मोठ्या प्रमाणात सेलिब्रेशन होणार असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. त्यानुसार तीन दिवसांपूर्वीच बंदोबस्त तैनात करुन पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे. शहरातील प्रमुख चौकांत, रिकाम्या भूखंडालगत, मैदानांलगत व संशयास्पद ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी गस्त वाढवली आहे. त्यामुळे नाशिककरांनी (Nashik) नियमांत राहूनच सेलिब्रेशन करण्याची सूचना पोलिसांनी केली आहे. पोलिसांनी शहरात तळीरामांचा ‘बंदोबस्त’ हाती घेतल्याने नववर्ष स्वागतावेळी धिंगाणा नियंत्रणात राहण्याची शक्यता आहे.

सीटीबी युनिटकडून कारवाई

वाहतूक विभागाच्या (Department of Transport) चारही युनिटने स्वतंत्र बंदोबस्त तैनात करुन ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’ कारवाईला सुरुवात केली आहे. तर, शहराबाहेरून येणाऱ्या रस्त्यांवर विशेष नजर ठेवण्यात येत आहे. तर गल्लीबोळांतल्या अंडा भुर्जी, पावभाजी, रोल्स व इतर हातगाड्यांवरही पोलिसांनी नजर ठेवली आहे. शहरातील सीसीटीव्हीमार्फत नियंत्रण कक्षातून सेलिब्रेशनवर पथकांचे लक्ष आहे. यंदा ताब्यात घेतल्यावर संबंधितांवर प्रतिबंधात्मक कारवाई अंतर्गत गुन्हे नोंद करण्याची तंबीदेखील पोलीस आयुक्तालयाने दिली आहे.

असा असणार बंदोबस्त

चार उपायुक्त, सात सहायक आयुक्तांसह सर्व अधिकारी-कर्मचारी
१३ पोलीस ठाण्यांचा बंदोबस्त
३ गुन्हे शाखा, ४ गुन्हे शोध पथके
शहरात सर्वत्र नाकाबंदीसह तपासणी
पाचशेपेक्षा अधिक होमगार्ड, दंगल नियंत्रण पथक; जलद प्रतिसाद पथक

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...