नाशिक | प्रतिनिधी | Nashik
आज (शनिवारी) जागतिक आदिवासी दिनानिमित्त (Tribal Day) नाशिकमध्ये (Nashik) पारंपारिक वेशभूषा धारण करून पारंपारिक वाद्यावर नृत्य सादर करत शोभा यात्रेतून आदिवासी संस्कृतीचे (Tribal Culture) दर्शन घडले. यावेळी एक तीर एक कमान, सारे आदिवासी एक समान, हर हर महादेवच्या घोषणानी परिसर दुमदुमून गेला होता.
जागतिक आदिवासी दिन (World Tribal Day) मोठ्या उत्साहात आणि आनंदाच्या वातावरणात साजरा झाला. नाशिकच्या पंचवटी कारंजा ते गोल्फ क्लब मैदानापर्यंत वाजतगाजत आदिवासी बांधवांकडून रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये आदिवासी बांधवांकडून त्यांची पारंपारिक वेषभूषा धारण करून ढोल ताश्यांच्या गजरात नृत्य साजरे करण्यात आले. यावेळी चौका चौकात असलेल्या महापुरूषांच्या पुतळ्यांना आदिवासी संघटनेच्या पदाधिकार्यांकडून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
पंचवटी कारंजापासून (Panchavati Karanja) निघालेल्या या मिरवणुकीत मोठ्या संख्येने आदिवासी बांधव भागींनी आणि तरुणाई सहभागी झाली होती. याप्रसंगी जल्लोष आणि उत्साह मोठ्या प्रमाणावर या रॅलीत दिसून आला. यावेळी आमदार हिरामण खोसकर, नितीन पवार, माजी आमदार निर्मला गावित, भारतीय आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष लकी जाधव, गणेश गवळी, लक्ष्मण खराटे, यांच्या नेतत्वाखाली ही भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेचा समारोप गोल्फ क्लब मैदानावर (Golf Club Grounds) झाला.
दरम्यान, बिऱ्हाड आंदोलनकर्त्याांनी रक्षाबंधन व आदिवासी दिन हे आंदोलनस्थळी साजरे केले. यावेळी आंदोलनातील महिलांनी पोलिसांना (Police) राख्या बांधल्या. तर उलगुलान कामगार संघटनेतर्फेही आदवासी दिन साजरा करण्यात आला. यावेळी दिलीप गांगुर्डे, अशोक गोतरणे, देवा वाटाणे, शशिकांत मोरे, शांताराम चारोस्कर, अरुण पवार, कैलास शार्दुल हे देखील उपस्थित होते.





