नाशिक | प्रतिनिधी | Nashik
आदिवासी आश्रमशाळांतील रोजंदारी शिक्षकांना (Teachers) काढून बाह्यस्त्रोतांद्वारे भरती करण्याच्या सरकारच्या निर्णयाला विरोध करणार्या बिऱ्हाड आ्रदोलकांचा संयम आज (मंगळवारी) सुटला. प्रवेशद्वारावरच्या पोलीसांचे सुरक्षाकडे तोडून आंदोलक आत घुसले. यावेळी अजूनही संयमाची परीक्षा पाहिल्यास गंभीर परिणाम होतील असा इशाराही देण्यात आला. यावेळी आंदोलकांनी (Protesters) कंपनीमार्फत बाह्यस्रोत भरती आदेश प्रत्यक्ष जाळून आपला रोष व्यक्त केला. या झटापटीत एका महिलेचा गळा दाबाल गेल्याने ती खाली कोसळली. यानंतर तिला रुग्णाालयात नेण्यात आले.
गेल्या ३४ दिवसापासून आंदोलनाला बसलेल्या या कर्मचार्यांनी आजपर्यंत शासन निर्णयाची (Government GR) वाट बघितली. मात्र प्रत्येक वेळी कोरड्या अश्वासना पलीकडे काहीही पदरी पडले नाही. त्यामुळे आज सकाळपासुनच ते पुढे पुढे सरकत होते, घोषणा देत होते. तरीही आदिवासी विकासविभाग (Tribal Department) त्याकडे दुर्लक्ष करत राहिल्याने शेवटी पाचच्या सुमारास आंदोलकांनी कडे तोडून आत प्रवेश केला.
दरम्यान, यावेळी पोलिसांनी (Police) कार्यालयाचे प्रवेशद्वार बंद करून त्यांना अडविले. त्यानंतर तेथेच आंदोलकांनी ठिय्या मांडला. उशीरापर्यंत आंदोलक बसलेले होते. रोजंदारी कर्मचार्यांना पुनश्च कामावर घ्या त्याशिवाय आम्ही हलणार नाही. असा इशाराही दिला. तसेच बाह्यस्रोताद्वारे भरती करतांना अपात्र ठरलेले तरुण भरले जात आहे, असाही आरोप करण्यात आला. यावेळी त्यांना पाठबळ देण्यासाठी आणखी काही आंदोलक शहरात दाखल झाले. त्यामुळे या आंदोलनाची धार वाढली आहे.




