Sunday, July 26, 2026
HomeनाशिकNashik News : पात्र निरीक्षकांनाच पदोन्नती; नाशिकमधील वीस पोलीस अधिकारी होणार 'एसीपी'

Nashik News : पात्र निरीक्षकांनाच पदोन्नती; नाशिकमधील वीस पोलीस अधिकारी होणार ‘एसीपी’

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शहर पोलीस आयुक्तालयातील सात आणि जिल्ह्यातील तेरा पोलीस निरीक्षकांना (Police Inspector) सहायक आयुक्तपदी बढती मिळणार आहे. राज्यातील विविध पोलीस (Police) संवर्गातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती देण्याचा मार्ग मोकळा झाल्याने पोलीस महासंचालक कार्यालयाने राज्यातील ४४८ निरीक्षकांची यादी केली आहे. डिसेंबरमध्ये कारकीर्दीची तपासणी झाल्यानंतर नववर्षात पात्र निरीक्षकांना सहायक आयुक्तपदी पदोन्नती मिळू शकते. तर नाशिकमधील ‘शालार्थ आयडी’ घोटाळ्याप्रकरणी निलंबित झालेला व सहसंशयित पोलीस निरीक्षक अशोक गिरी याचेही नाव यादीत आहे.

- Advertisement -

सन २०२५-२६ च्या सेवाज्येष्ठता सूचीनुसार अंतिम निवडसूची तयार करून पदोन्नती देण्यात येणार आहे. विचारकक्षेत असलेल्या अधिकाऱ्यांची कारकीर्द, प्रलंबित प्रकरणे, खात्यांतर्गत चौकशी किंवा कारवाई यासह विविध स्वरुपाच्या कामकाजाची व सेवापुस्तिकेची पडताळणी डिसेंबर महिन्यात होईल. त्यानुसार १५ डिसेंबर रोजी नागपूर, गडचिरोली, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, नाशिक, कोकण परिक्षेत्रासह सर्व लोहमार्ग, १६ डिसेंबर रोजी कोल्हापूर परिक्षेत्र, गुन्हे अन्वेषण विभाग, सर्व जिल्हा समाजकल्याण विभाग, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, राज्य गुप्तावार्ता विभागासह सर्व पोलीस प्रशिक्षण विद्यालये, १७ डिसेंबर रोजी सर्व पोलीस आयुक्तालयांमधील अधिकारी महासंचालक कार्यालयात हजर राहतील. दरम्यान, ही पडताळणी पूर्ण झाल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांपैकी पात्र निरीक्षकांच्या पदोन्नतीचे आदेश जारी केले जातील.

… हे होणार एसीपी

नाशिक शहरातील गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड, सरकारवाड्याचे सुरेश आव्हाड, आर्थिक गुन्हे शाखेचे रामदास शेळके, वाहतूकचे रियाज शेख, सिंहस्थ कक्षाचे सोहन माछरे, पोलीस कल्याण विभागाच्या सुरेखा पाटील, सुशील जुमडे यांच्यासह नाशिक ग्रामीणचे दत्ता चौधरी, विजय शिंदे, सुधीर पाटील, दिगंबर भदाणे, ओमप्रकाश कोकाटे, खगेंद्र टेंभेकर, समाधान नागरे, हेमंतकुमार पाटील तर महाराष्ट्र पोलीस अकादमीतील सुनील रोहोकले, दिलीप ठाकूर तसेच अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीच्या सीमा परिहार, जिल्हा जात पडताळणी समितीचे संजयकुमार गावित यांचा समावेश आहे.

नवे अधिकारी मिळणार

शहर पोलीस आयुक्तालयातील सर्वाधिक अशोक गिरी धरून आठ अधिकाऱ्यांना पदोन्नती मिळणार असल्याने आयुक्तालय बरेचसे खाली होणार आहे. वरील आठ वरिष्ठ निरीक्षकांना पदोन्नती मिळाल्यानंतर त्यांच्या जागांवर नव्याने निरीक्षक बदलून येणार आहेत. या पदोन्नतीमुळे आयुक्तालयातील ईओडब्ल्यूसह गंगापूर, सरकारवाडा पोलीस ठाणे, सिंहस्थ सेल, सीटीबी युनिट आणि वेल्फेअरमधील निरीक्षकपद रिक्त होणार आहे. या रिक्त जागांवर आयुक्तालयातील काही निरीक्षक आणि नवीन अधिकाऱ्यांची वरिष्ठ निरीक्षक म्हणून वर्णी लागू शकते.

ताज्या बातम्या

Rahul Gandhi : राहुल गांधींचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना खरमरीत...

0
नवी दिल्ली | New Delhi दिल्लीतील जंतरमंतर येथे नीट परीक्षेचा (Neet Exam) पेपर फुटीच्या कारणावरून आणि पारदर्शक शिक्षण व्यवस्थेच्या मागणीसाठी शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर...