Tuesday, September 15, 2026
HomeनाशिकNashik News : गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी दुर्दैवी घटना; मंदिरावर झेंडा लावताना दोन...

Nashik News : गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी दुर्दैवी घटना; मंदिरावर झेंडा लावताना दोन मुलांना विजेचा शॉक, एक गंभीर

सातपूर | Satpur

गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी सातपूर परिसरातील (Satpur Area) जेपी नगर येथे एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. हनुमान मंदिरावर (Hanuman Mandir) भगवा झेंडा लावत असताना उच्चदाबाच्या विद्युत वाहिनीचा स्पर्श झाल्याने दोन अल्पवयीन मुलांना विजेचा जोरदार शॉक लागला. यामध्ये १५ वर्षीय आयुष मिरेकर हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

नेमकी कशी घडली घटना?

गणेश चतुर्थीनिमित्त जेपी नगर येथील हनुमान मंदिरावर भगवा झेंडा लावण्यासाठी आयुष शंकर मिरेकर (वय १५) आणि आदित्य अशोक मिरेकर हे दोघे मंदिरात गेले होते. झेंड्यासाठी लोखंडी रॉडचा वापर करण्यात आला होता. झेंडा लावत असताना मंदिराच्या जवळून जाणाऱ्या उच्चदाबाच्या मुख्य विद्युत वाहिनीचा (High Voltage Line) या लोखंडी रॉडला अचानक स्पर्श झाला. यामुळे दोघांनाही विजेचा जोरदार झटका बसला. या धक्क्यामुळे आयुष खाली कोसळला.

रूग्णालयात उपचार सुरू

घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्या आयुषला तात्काळ ‘सिग्मा हॉस्पिटल’मध्ये दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. तर दुसरा मुलगा आदित्य याला ‘कराड हॉस्पिटल’मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

पोलीस आणि लोकप्रतिनिधींची घटनास्थळी धाव

या दुर्घटनेची माहिती मिळताच सातपूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक (API) भडांगे आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच माजी नगरसेवक नितीन निगळ आणि सामाजिक कार्यकर्ते रवी काळे यांनीही रुग्णालयात पोहोचून मुलांच्या प्रकृतीची विचारपूस केली.उत्सवाच्या पहिल्याच दिवशी घडलेल्या या भीषण अपघातामुळे जेपी नगर परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात असून, आयुषच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी नागरिक प्रार्थना करत आहेत.

ताज्या बातम्या

Onion Rate : राहाता बाजार समितीत कांद्याला काय मिळतोय भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata मंगळवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) कांदा आवक वाढली. कांद्याला प्रतिक्विंटल सर्वाधिक 5800 रुपयांपर्यंत भाव मिळाला. मंगळवारी कांद्याची (Onion) राहाता...