येवला | प्रतिनिधी | Yeola
तालुक्यातील मुखेड शिवारात ऊसाने भरलेली ट्रॉली (Sugarcane Trolley) पलटी झाल्याने ऊसाखाली दाबून दोन कामगार जागीच ठार (Killed) झाले. तर एक गंभीर जखमी झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सदर घटना शुक्रवारी (दि.१४ ) रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत आनंदा मुरलीधर काकड, सखाराम कालसिंग भिलाला जागीच ठार झाले. तर मजूर नरसिंग गणसिंग भिलाला (रा. रावेर) हा गंभीर जखमी झाला.
ट्रॉलीचे टायर पंचर झाल्याने टायर बदलण्याचे काम सदर मजूर करत होते. मात्र, टायर बदलण्यासाठी लावलेला लोखंडी जॅक तुटल्याने ऊसाने भरलेली ट्रॉली जागीच पलटी झाली आणि स्टेपनी बदलणारे जागीच दाबले गेले.
दरम्यान, घटनास्थळी ग्रामस्थांनी तत्काळ धाव घेत ऊस बाजूला करत मयत व जखमीला बाहेर काढले. यानंतर रुग्णवाहिकेद्वारे पुढील उपचारासाठी येवला येथे दाखल करण्यात आले. याप्रकरणी तालुका पोलीसात (Taluka Police) अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




