Wednesday, November 13, 2024
HomeनाशिकNashik News : स्मार्ट कार्ड पोहोचवण्याची लगबग; दोन लाख ४० हजार मतदारांना...

Nashik News : स्मार्ट कार्ड पोहोचवण्याची लगबग; दोन लाख ४० हजार मतदारांना मिळणार ओळखपत्र

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

विधानसभा निवडणुकीत (Vidhansabha Election) मतदानासाठी (Voting) अवघे दहा दिवस उरल्याने ‘स्मार्ट कार्ड (ई-पीक) मतदारांपर्यंत पोहोचवण्याची लगबग गतिमान झाली आहे. दि.६ ऑगस्ट ते दि.२९ ऑक्टोबर २०२४ या साधारणतः तीन महिन्यांच्या काळात नोंदणी केलेल्या दोन लाख ४० हजार मतदारांना स्मार्ट कार्ड मिळणार आहेत. प्रत्यक्षात त्यातील ५९ हजार कार्डची (Card) निवडणूक शाखेलाच प्रतीक्षा असल्याचे दिसून येत आहे. राज्याच्या विधानसभा निवडणुकांसाठी येत्या दि.२० तारखेला मतदान होणार आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Political : दहशत रोखण्यासाठी सीमा हिरेंना निवडून द्या; ज्येष्ठ नेते मामा ठाकरे यांचे मतदारांना आवाहन

जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदारसंघातील (Legislative Assembly Constituency) ४ हजार ९२२ मतदान केंद्रावर मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्ह्यात एकूण ५० लाख ६१ हजार मतदारांची नोंद झाली.दि.४ जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर दि.६ जूनपासून नवीन मतदार नोंदणी सुरु झाली. लोकसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात ४८ लाख ३८ हजार मतदारांची नोंदणी झाली होती.मतदार नोंदणी अभियान जोमाने राबविण्यात आल्यानंतर ऑगस्ट ते ऑक्टोबर या तीन महिन्यांत जिल्ह्यात दोन लाख ४० हजारांवर मतदारांची वाढ झाली.

हे देखील वाचा : Nashik Political : नाशिक मध्यत हिंदुत्ववादाचाच विजय होणार; आमदार देवयानी फरांदे यांचा विश्वास

यात सर्वाधिक मतदार मालेगाव मध्य येथे ३८ हजार २७९ इतके झाले, तर सर्वात कमी मतदार नोंदणी इगतपुरीत ४ हजार ८५७ इतकी झाली आहे. नवीन नोंदणी केलेल्या मतदारांना पोस्टाद्वारे घरपोहोच ओळखपत्र पाठवले जात आहे. आतापर्यंत १ लाख ८० हजार मतदारांचे कार्ड संबंधित निवडणूक शाखेकडे प्राप्त झाले आहेत. उर्वरित ५९ हजार कार्डची प्रतीक्षा असून, त्यांना येत्या दहा दिवसांच्या आत कार्ड पोहोचवण्याचे प्रमुख आव्हान निवडणूक विभागासमोर राहील.

हे देखील वाचा : ‘बहुरंगी आणि बहुढंगी’ आमदार बदलण्याची वेळ : पाटील

मतदार यादीत नाव आवश्यक

मतदानासाठी ओळखपत्र आवश्यक असणे गरजेचे नाही. मात्र, मतदाराचे नाव मतदान यादीत समाविष्ठ असणे गरजेचे आहे.त्यासाठी मतदार याद्या नूतनीकरण करतात, तेव्हा १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर नाव नोंदण्याची आवश्यकता असते. अन्यथा मतदानाचा अधिकार प्राप्त होत नाही. नवीन नावाची नोंद करणे किंवा हयात नसलेल्या व्यक्तीची नावे हटविण्यासाठी स्वतंत्र फॉर्म भरावा लागतो.

हे देखील वाचा : निफाडचा सुवर्णकाळ गुरुदेव कांदे परत आणणार : दत्तू बोडके

यापैकी कोणतेही एक कागदपत्रही चालेल

आधारकार्ड
पॅनकार्ड
पेन्शनकार्ड
यूनिक डिसअॅबिलिटी आयडी यूडीआयडी
सर्व्हिस आयडीकार्ड
पोस्ट ऑफीस किंवा बँकेचे पासबुक
श्रम मंत्रालयाचे हेल्थ इंश्योरेंस स्मार्ट कार्ड
ड्रायव्हिंग लायसन्स
पासपोर्ट
नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टरचे आरजीआय स्मार्ट कार्ड
आमदार, खासदार यांचे ऑफिशियल आयडी कार्ड
मनरेगा कार्ड

हे देखील वाचा : सुरगाण्याच्या विकासाला प्राधान्य – मुंडे

नांदगाव ७,४८९
मालेगाव मध्य ३८,२७९
मालेगाव बाहा १६,४९३
बागलाण८.०६९
कळवण ६,७८६
चांदवड ८,०५९
येवला ९,२४८
सिन्नर १३,८७६
निफाड ५. ६९५
दिंडोरी ६,८२८
नाशिक पुर्व १७,९१०
नाशिक मध्य १५,५२२
नाशिक पश्चिम २२,४५५
देवळाली १५,६४४
इगतपुरी ४,८५७
एकूण १,९७, २१०
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या