Thursday, May 14, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik Leopard News : सिन्नरच्या निमगाव-देवपूर परिसरात दोन बिबटे जेरबंद

Nashik Leopard News : सिन्नरच्या निमगाव-देवपूर परिसरात दोन बिबटे जेरबंद

सिन्नर | वार्ताहर | Sinnar

तालुक्यातील निमगाव-देवपूर परिसरातील (Nimgaon-Devpur Area) शेतकऱ्यांना (Farmer) गेल्या काही दिवसांपासून बिबट मादी व तिचे बछडे फिरताना आढळून आले होते. त्यामुळे नागरिकांमध्ये (Citizen) भितीचे वातावरण पसरले होते. यानंतर वनविभागाने त्याठिकाणी पिंजरे लावले होते. या पिंजऱ्यात आता दोन बिबटे जेरबंद झाले आहेत.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, इंद्रभान ठोक यांच्या शेतातील गट नंबर १४३ मध्ये वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात काल (बुधवारी) पहाटेच्या सुमारास एक बिबट्याचा (Leopard) बछडा अडकून जेरबंद झाला. तर काल संध्याकाळीच पुन्हा एकदा एक मादी बिबट जेरबंद झाली. ही माहिती कळताच वनविभागाने घटनास्थळी हजेरी लावली होती.बछड्याचे वय अंदाजे दहा महिने, तर एक वर्षाच्या मादीचे वय अंदाजे दोन ते अडीच वर्ष असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, सहाय्यक वनसंरक्षक कल्पना वाघेरे, वनपरिक्षेत्र अधिकारी हर्षल पारेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल तानाजी भुजबळ, वनरक्षक संतोष चव्हाण, वन्यजीव बचाव पथक रोहित लोणारे, निखिल वैद्य, मधुकर शिंदे व वन कर्मचारी उपस्थित होते. तर सदर जेरबंद झालेले बिबट हे महोदरी वन उद्यान सिन्नर येथे ठेवण्यात आले आहेत. तसेच वनविभागाने नागरिकांना रात्री बाहेर जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे. याशिवाय वनविभागाचे (Forest Department) पथक परिसरात गस्त वाढवून शोधमोहीम राबवत आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : नीट पेपरफुटीतील मुख्य एजंट राहुरीचा

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar देशभरात गाजत असलेल्या नीट (नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट) पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे आता अहिल्यानगर जिल्ह्यापर्यंत पोहोचले आहेत. सीबीआयच्या पथकाने नाशिक येथील शुभम...