Thursday, September 19, 2024
Homeनाशिकनाशकात गणपती विसर्जन मिरवणुकीला गालबोट; वालदेवी नदीत बुडून दोन युवकांचा मृत्यू

नाशकात गणपती विसर्जन मिरवणुकीला गालबोट; वालदेवी नदीत बुडून दोन युवकांचा मृत्यू

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

- Advertisement -

नाशिक शहर व परिसरात (Nashik City Area) गणेश विसर्जन (Ganesh Visarjan) उत्साहात पार पडत असतानाच पाथर्डी परिसरातील नांदूर रस्ता वालदेवी नदीवर (Valdevi River) गणेश विसर्जनासाठी गेलेल्या दोन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा विसर्जन करीत असताना दुर्दैवी अंत झाल्याने गणेश विसर्जनाला गालबोट लागले. त्यांच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

हे देखील वाचा : Rahul Gandhi : “त्यांच्या जिभेला चटके…”; आमदार संजय गायकवाडांनंतर भाजप खासदाराचे राहुल गांधींबद्दल वादग्रस्त वक्तव्य

याबाबत अधिक माहिती अशी की, पाथर्डी, पिंपळगाव खांब व दाडेगाव परिसरात काल सकाळपासूनच गणेश विसर्जनाची वालदेवी नदीवर मोठ्या प्रमाणात गर्दी होती. उत्साहाच्या वातावरणात गणेश विसर्जन सुरू होते (दि १८) रोजी मंगळवारी संध्याकाळी साडेसहाच्या दरम्यान गणेश विसर्जनासाठी म्हाडा कॉलनी येथे राहणारे ओंकार चंद्रकांत गाडे (२३) स्वयंम भैया मोरे (२४) हे गणेश विसर्जनासाठी गेले होते. गणेश विसर्जनसाठी ते नदी पात्रात उतरले. परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात बुडाले. त्या ठिकाणी उभे असलेल्यांनी आरडाओरडा करून त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न केला. काहींनी नदीत उतरून शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, बघता बघता ते दिसेनासे झाले. त्यांच्या मित्रांनी त्यांचा पाण्यात शोध घेतला परंतु ते मिळून न आल्याने याची माहिती नातेवाईकांना देण्यात आली.

हे देखील वाचा : दशकभरानंतर जम्मू काश्मीरमध्ये मतदानाला सुरुवात, मतदारांमध्ये उत्साह

यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी अग्निशमन दलाला ही माहिती कळवताच परिसरात जवळच असलेल्या अग्निशमन दलाने वेळेचा विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली. तसेच इंदिरानगर पोलीस स्टेशनचे (Indiranagar Police Station) वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शर्माळे माजी नगरसेवक भगवान दोंदे, युवा जिल्हाप्रमुख बाळकृष्ण शिरसाठ, पाथर्डी गावातील काही सामाजिक कार्यकर्ते हे देखील हजर झाले. त्यांनीही सहकार्य करीत शोध घेण्यास मदत केली. एक तासाच्या शोधानंतर दोघांचेही मृतदेह (Dead Body) बाहेर काढण्यात आले.

हे देखील वाचा :  नवाब मलिकांच्या जावयाचा भीषण अपघात; कारचालकाची चूक, ब्रेक ऐवजी एक्सलेटर पाय पडला अन्…

त्यानंतर इंदिरानगर पोलिसांकडून (Police) पंचनामा करण्यात आला. दरम्यान, मयत ओमकार हा केटीएचएम महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत होता. तर स्वयंम मोरे संदीप फाऊंडेशनमध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता. या दोन्ही तरुण महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या मृत्यूमुळे (Death) म्हाडा कॉलनी व पाथर्डी परिसरात शोककळा पसरली आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या