Saturday, November 2, 2024
HomeनाशिकNashik News : चालत्या बसचे टायर निघून कारला धडकले

Nashik News : चालत्या बसचे टायर निघून कारला धडकले

पिंपळगाव बसवंत | वार्ताहर | Pimpalgaon Baswant

चालत्या बसचे मागील टायर निघून पुढे एक किलोमीटर अंतरावर रस्त्याच्या कडेला उभ्या कारवर जाऊन आदळल्याची घटना पाचोरे वणी फाट्यावर घडली. या घटनेत कारचे नुकसान झाले असून, सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही…

- Advertisement -

याबाबत माहिती अशी की, धुळे आगाराच्या धुळे – नाशिक बायपास विनावाहक बसचे (क्र. एमएच – २० – जीसी – ३५६०) पाठीमागील टायर निखळून पुढे एक किलोमीटर जाऊन रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारला (क्रमांक एमएच ०६ एएस- ७७९४) जोरदार धडकले. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.

नाशिकरोडला विसर्जन मिरवणुकीवेळी तिघांचा मृत्यू; सोळा तासानंतर वाहून गेलेल्या ‘त्या’ युवकाचा मृतदेह सापडला

मात्र, या घटनेमुळे महामंडळाचे बस दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. विशेष म्हणजे दोन महिन्यांपूर्वी शिरवाडे वणी फाट्यावर वेगात जात असलेल्या बसने तीन तरुणांना धडक दिल्याने त्यांना जीव गमवावा लागला होता. त्यानंतर आजच्या घटनेमुळे बसच्या दुरुस्तीकडे होणारे दुर्लक्ष समोर आले आहे. सदर बसमधून शिरवाडे वणी फाट्यापासूनच आवाज येत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Panjaka Munde: मराठी असल्याने पंकजा मुंडेंनाही मुंबईत घर नाकारलं; व्हिडिओ शेअर करत म्हणाल्या…

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या