Tuesday, September 8, 2026
Homeमुख्य बातम्याNashik News : सप्तशृंगी गडावर अज्ञात युवकाची गळफास घेऊन आत्महत्या; कळवण पोलीस...

Nashik News : सप्तशृंगी गडावर अज्ञात युवकाची गळफास घेऊन आत्महत्या; कळवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

नांदुरी | वार्ताहर | Nanduri

सप्तशृंगी गडावरील (Saptshrungi Gadh) जंगलात एका अज्ञात युवकाने (Youth) झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. सदर प्रकार सप्तशृंगी गडावरील ग्रामस्थ संदीप शशिकांत बेनके यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तात्काळ कळवण पोलीस ठाण्याला या घटनेची माहिती दिली.

- Advertisement -

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, जगन काळू सूर्यवंशी यांच्या घराजवळील शेताच्या पश्चिम बाजूला असलेल्या जंगलात एका झाडाला युवकाचा मृतदेह (Dead Body) लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. मृत युवक अंदाजे ३० ते ३५ वर्षे वयाचा असून, मृतदेह पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत होता. मृतदेहाच्या अंगात जांभळ्या रंगाचे जर्किंग आणि काळ्या रंगाची नाईट पॅन्ट आहे. तसेच त्याच्या उजव्या हातावर ‘छत्रपती’ असे नाव गोंदलेले आढळले आहे.

दरम्यान, या घटनेबाबत कळवण पोलीस ठाण्यात (Kalwan Police Station) आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंभेकर यांच्या आदेशाने आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सी. डी. बोंबले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मानसाराम बागुल, योगेश गवळी, संदीप बत्तीसे व राजेंद्र चौधरी पुढील तपास करत आहेत.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : खून करण्यासाठी मिटिंग प्रकरण; शेखर निकमच्या ताब्याला...

0
​नाशिक | प्रतिनिधी | Nashik फुलेनगरातील सागर जाधव (Sagar Jadhav) याच्यावर झालेल्या गोळीबार व हत्येचा कट रचल्यामागील सूत्रधार मानला जाणारा अमरावती मध्यवर्ती कारागृहातील (Amravati Central...