नाशिक | Nashik
आज (सोमवार) आठवड्याच्या पहिल्याच दिवशी अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) सायंकाळी सव्वा पाच वाजेच्या सुमारास हजेरी लावली. त्यामुळे चाकरमान्यांसह अन्य नागरिकांची पावसामुळे (Rain) चांगलीच तारांबळ उडाली.
काल (रविवारी) दिवसभर आणि आज (सोमवारी) शहरात उकाडा जाणवत होता. ढगाळ हवामान व मंदावलेल्या वाऱ्यामुळे नागरिक घामाघूम झाले होते. यानंतर अखेर आज सायंकाळच्या सुमारास अवकाळी पावसाने विजांच्या कडकडाटासह हजेरी लावली.
दरम्यान, नाशिक शहरासह (Nashik City) जिल्ह्यासाठी (District) आणि घाटप्रदेशाकरिता हवामान खात्याकडून पावसाचा आज (दि.१९) रोजी ऑरेंज तर गुरुवारपर्यंत (दि.२२) ‘यलो’ अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे आणखी काही दिवस पाऊस कोसळणार आहे.
यंदा मान्सून केरळात लवकर दाखल होणार
यंदा नैऋत्य मोसमी पाऊस देशात वेळेत दाखल होण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळणार आहे. मान्सून नियोजित तारखेच्या चार दिवस आधी म्हणजेच २७ मे रोजी केरळमध्ये येणार आहे. हवामान विभागाने यासंदर्भात माहिती दिली आहे. दरवर्षी केरळमध्ये मान्सून १ जूनला दाखल होत असतो. यानंतर आता आयएमडीच्या अंदाजानुसार, यावर्षी मान्सून २३ मे ते ३१ मे या कालावधीत येऊ शकतो. तसेच यंदा देशभरात चांगल्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे जून ते सप्टेंबरमध्ये १०५ टक्के पावसाचा अंदाज आहे.