Saturday, July 27, 2024
HomeनाशिकNashik News : 'या' ग्रामपंचायतीने उचलला 150 मुलींच्या प्रवासाचा खर्च

Nashik News : ‘या’ ग्रामपंचायतीने उचलला 150 मुलींच्या प्रवासाचा खर्च

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

विद्यार्थिनींना महाविद्यालयात येण्या जाण्यासाठीचा प्रवास खर्च वडनेर भैरव ग्रामपालिका आपल्या स्वतःच्या निधीतून करत असून या चालू शैक्षणिक वर्षात महाविद्यालयात प्रवेश घेणार्‍या वडनेर ग्रामपंचायत क्षेत्रातील सुमारे दीडशे मुलींचा प्रवासाचा खर्चापोटी वडनेर ग्रामपालिकेने तीन लाख रुपये  देण्याचे जाहीर केले आहे. मुलींच्या शिक्षणासाठी असा खर्च करणारी ही जिल्ह्यातील पहीलीच ग्रामपंंचायत ठरली आहे…

- Advertisement -

वडनेर भैरव- येथील मविप्र संचलित कला वाणिज्य व विज्ञान महाविद्या्लयात अठरा वर्ष पूर्ण झालेल्या 356 विद्यार्थ्यांचे नाव मतदार यादीत नोंदवून त्यांना मतदानाचा हक्क देण्याच्या दृष्टीने मतदान नोंदणी अभियान महाविद्यालयात आयोजित करण्यात आले होते.

या कार्यक्रमाला शासनाच्या वतीने चांदवड तहसीलचे तहसीलदार मंदार कुलकर्णी, संस्थेचे सरचिटणीस अ‍ॅड. नितीन ठाकरे, संस्थेचे चांदवड तालुका संचालक डॉ सयाजीराव गायकवाड, प्राचार्य ए. एल. भगत यांनी नव्याने नोंदणी केलेल्या 356 विद्यार्थ्यांची यादी तहसीलदारांकडे सोपवली. या कार्यक्रमाचे औचित्य साधून वडनेर ग्रामपालिकेने आपली एक वेगळी ओळख वरील निर्णयाने निर्माण केली.

भर बैठकीत अंबादास दानवे आणि संदीपान भुमरेंमध्ये जुंपली, थेट अंगावर गेले धावून… VIDEO व्हायरल

वडनेर ग्रामपालिकेने रुपये तीन लाख रुपये महाविद्यालयाला देण्याचे घोषित केले. सरचिटणीस नितीन ठाकरे यांच्या उपस्थितीत त्याचा धनादेश रुपये दीड लाख महाविद्यालयाला सुपूर्द केला. यानिमित्ताने नितीन ठाकरे यांनी वडनेर ग्रामपालिकेचे सरपंच सुनील पाचोरकर व त्यांच्या सर्व सहकार्‍यांचे आभार मानले. ग्रामपालिकेचा हा उपक्रम नक्कीच इतर ग्रामस्थासाठी आदर्शवत आहे. ग्रामपालिकेच्या या प्रयत्नाने मुलींच्या शिक्षणातील टक्केवारी वाढवून समाज प्रगत होण्यासाठी नक्कीच होईल, असा विश्वासदेखील नितीन ठाकरे यांनी व्यक्त केला.
 

रोजगार मेळाव्यातून मंत्री छगन भुजबळ यांचे आवाहन; म्हणाले…

या कार्यक्रमात महाविद्यालयीन विकास व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष इंजि. दिलीप धारराव, सरपंच सुनील  पाचोरकर, उपसरपंच देवरे, माजी उपसरपंच योगेश साळुंखे, ग्रामपंचायत सदस्य अमोल माळी, बाळासाहेब माळी, तलाठी गुंडरे, पोपट पवार, पोपट पाचोरकर उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. अमोल ठाकरे यांनी तर आभार प्रा. चंद्रशेखर मोरे यांनी मानले.

मुंबईकरांची लुट होतेय, हिंमत असेल तर टोलनाके बंद करा; आदित्य ठाकरे शिंदे सरकारवर कडाडले

- Advertisment -

ताज्या बातम्या