Wednesday, July 22, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik News : सुरगाणा तालुक्यात भूकंपाचे अतिसौम्य धक्के; मेरी येथील केंद्रात २.१...

Nashik News : सुरगाणा तालुक्यात भूकंपाचे अतिसौम्य धक्के; मेरी येथील केंद्रात २.१ रिश्टर स्केल इतकी नोंद

सुरगाणा | प्रतिनिधी | Surgana

तालुक्यातील घाटमाथा परिसरात (Ghatmatha Area) गुरुवारी रात्री (दि.०२) रोजी दोन वेळा भूकंपाचे (Earthquake) अतिसौम्य धक्के जाणवले. त्यामुळे वांजुळपाडा, नागशेवडी, मोहपाडा, चिराई आणि शिंदे गाव परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना सावधानता बाळगण्याचे आवाहन केले आहे.

- Advertisement -

मेरी (Meri) येथील भूकंप मापन केंद्रातील नोंदीनुसार या धक्क्याची तीव्रता अत्यंत सौम्य म्हणजेच २.१ रिश्टर स्केल इतकी नोंदवली गेली आहे. गुरुवारी रात्री सव्वानऊ वाजता पहिला आणि साडेअकरा वाजता भूकंपाचा दुसरा अति सौम्य धक्का जाणवला. या भूकंपामुळे कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नसल्याचे सूत्रांच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, गेल्या महिन्यात १६ सप्टेंबर रोजी देखील घाट माथ्यावर भूकंपाचे धक्के बसल्याची चर्चा होती. मात्र त्याची मेरी येथील भूकंप मापन केंद्रात अधिकृत नोंद झाली नव्हती. तहसीलदार रामजी राठोड यांनी ग्रामसभांच्या माध्यमातून सतर्कतेचा सल्ला देत, सुरक्षेचे निकष पाळण्याचे आवाहन या भागातील नागरिकांना (Citizen) केले आहे. या भागात यापूर्वीही अशा सौम्य भूकंपाचे धक्के जाणवल्याचे सरपंच पुंडलिक पवार यांनी सांगितले. ग्रामस्थांनी पुरेशी काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

ताज्या बातम्या

Bhandardara : आषाढ सरींचे तांडव सुरू; भंडारदरा ‘एवढे’ टक्के भरण्याच्या मार्गावर

0
भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा धरण पाणलोटात काल मंगळवारी दुपारपासून आषाढसरींनी तांडव नृत्य करण्यास सुरूवात केल्याने 11039 दलघफू क्षमतेचे भंडारदरा धरण...