Thursday, May 7, 2026
HomeराजकीयNashik News : भगूर नगरपरिषदेची प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर

Nashik News : भगूर नगरपरिषदेची प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर

महिला आरक्षणामुळे पुरुषांची संधी हुकली

भगूर | वार्ताहर | Bhagur

आगामी निवडणुकीच्या (Election) पार्श्वभूमीवर आज (दि. ८ ऑक्टोबर) रोजी राज्य शासनाच्या (State Government) आदेशान्वये व सूचनेनुसार भगूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ आरक्षण सोडत जिल्हा पुनर्वसन अधिकारी तथा प्राधिकृत अधिकारी भारदे यांनी मुख्याधिकारी डॉ. सचिन कुमार पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत भगूर नगरपरिषद कार्यालय येथे सकाळी जाहीर केली.

- Advertisement -

सदर आरक्षण सोडत कार्यक्रमासाठी प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉ. सचिनकुमार पटेल यांच्या सूचनेनुसार कर निरीक्षक प्रवीण मराठे यांनी आरक्षण सोडत कार्यक्रमाची माहिती उपस्थित असलेल्या भगूर शहरातील (Bhagur City) सर्वच राजकीय पक्षाचे पदाधिकारी, नागरिक यांना दिली. याप्रसंगी कार्यालयीन अधीक्षक पल्लवी सूर्यवंशी, नगर रचनाकार रोशन उगले, संगणक अभियंता रोहित सुरसे, स्वच्छता निरीक्षक दिनेश कचवे, लेखापाल सोमनाथ देवकाते, नगर अभियंता सिद्धेश मुळे, शहर समन्वयक गोरख भालके, शंशाक तिवडे, दिलीप वाघ, चित्रा भवरे, सोनाली सिरसाट, पुनम गवळी, मंगला बागुल, अलका देवगिरे आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते .

दरम्यान, दहा प्रभागांमध्ये (Ten Ward) प्रत्येक प्रभागात दोन उमेदवार याप्रमाणे दहा पुरुष व दहा महिला असे एकूण दहा प्रभागात उमेदवार (Candidate) निवडून येतील असे आरक्षण जाहीर करण्यात आले.

प्रभाग निहाय आरक्षण खालीलप्रमाणे (दोन उमेदवारांसाठी प्रभाग)

प्रभाग क्र.१ – अ) अनुसूचित जाती, सर्वसाधारण, ब) सर्वसाधारण महिला

प्रभाग क्र. २ – अ.) अनुसूचित जाती महिला, ब) सर्वसाधारण

प्रभाग क्र. ३ – अ) इतर मागासवर्ग महिला, ब) सर्वसाधारण

प्रभाग क्र.४ – अ) इतर मागासवर्ग महिला प्रभाग, ब) सर्वसाधारण

प्रभाग क्र.५ – अ) इतर मागासवर्ग सर्वसाधारण, ब) सर्वसाधारण महिला

प्रभाग क्र. ६ – अ) इतर मागासवर्ग महिला, ब) सर्वसाधारण

प्रभाग क्र.७ – अ) इतर मागासवर्ग सर्वसाधारण, ब) सर्वसाधारण महिला

प्रभाग क्र.८– अ) अनुसूचित जमाती, ब) सर्वसाधारण महिला

प्रभाग क्र. ९ – अ) अनुसूचित जाती महिला, ब) सर्वसाधारण

प्रभाग क्र.१० – अ) अनुसूचित जाती सर्वसाधारण ब) सर्वसाधारण महिला

ताज्या बातम्या

भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुंबई | वृत्तसंस्था Mumbai भारत आणि व्हिएतनाम यांच्यातील संबंध अधिक बळकट करण्यासाठी महाराष्ट्र विश्वासार्ह भागीदार म्हणून कार्य करण्यास सज्ज आहे. व्हिएतनाम सोबत सांस्कृतिक, आर्थिक आणि...