नांदगाव | प्रतिनिधी | Nandgaon
नांदगाव नगरपरिषदेचे (Nandgaon Municipal Council) नगराध्यक्षपद सर्वसाधारण आरक्षणानंतर शहरातील १० प्रभागनिहाय आरक्षण (Reservation) सोडत बुधवारी सकाळी ११ वाजता नगरपरिषदेच्या सभागृहात प्रांताधिकारी नितीन सदगीर, मुख्याधिकारी. तथा प्रशासक श्यामकांत जाधव यांच्या उपस्थितीत काढण्यात आली. नांदगाव नगरपरिषदेत एकूण दहा प्रभाग असून, वीस सदस्य संख्या आहे.
आरक्षण गुरुवारी प्रसिद्ध केले जाणार असून, त्यावर हरकती व सुचना दि. ९ ते १४ ऑक्टोबरपर्यंत दाखल करता येणार आहे. हरकती व सूचना दाखल करणाऱ्या नागरिकांना (Citizen) आवश्यक असल्यास सुनावणी करता उपस्थित राहण्यासाठी स्वतंत्रपणे कळविण्यात येईल असे सांगितले आहे.
दरम्यान, नांदगाव पालिकेत (Nandgaon NMC) २० हजार ४९२ मतदारांची नोंद झालेली असून, गेल्या सहा वर्षांच्या तुलनेत अवघ्या ७९२ नव्या मतदारांची नोंद झाली आहे.
दहा प्रभागनिहाय आरक्षण पुढीलप्रमाणे
प्रभाग क्रमांक : १ -अ) अनुसूचित जाती (महिला) ब) सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक : २ अ) अनुसूचित जाती ब) सर्वसाधारण (महिला), प्रभाग क्रमांक : ३ अ) अनुसूचित जाती (महिला) ब) सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक : ४ अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), ब) सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक : ५ अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) ब) सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक : ६ अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग, ब) सर्वसाधारण( महिला), प्रभाग क्रमांक : ७ अ) अनुसूचित जमाती, ब) सर्वसाधारण( महिला), प्रभाग क्रमांक ८ अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग, ब) सर्वसाधारण (महिला), प्रभाग क्रमांक : ९ अ) अनुसूचित जाती, ब) सर्वसाधारण (महिला), प्रभाग क्रमांक : १० अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), ब) सर्वसाधारण, याप्रमाणे आरक्षणासाठी सोडत काढण्यात आली आहे.




