Friday, May 16, 2025
HomeनाशिकNashik News: पाणी जपून वापरा, जिल्ह्यातील धरणसमुहात 'इतक्या' टक्के पाणीसाठा; प्रशासनाचे आवाहन

Nashik News: पाणी जपून वापरा, जिल्ह्यातील धरणसमुहात ‘इतक्या’ टक्के पाणीसाठा; प्रशासनाचे आवाहन

नाशिक | प्रतिनिधी
जिल्ह्यातील धरण समुहात अवघा २८.३६ टक्के म्हणजेच १८ हजार ६२४ दलघफू पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत असल्याचे जलाशयातील पाणीपातळी तळ गाठत आहे. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातही दिवसेंदिवस पाणी पातळी खालावली जात आहे.

- Advertisement -

गंगापूर धरण समूहात ३३.७५ टक्के म्हणजे ३ हजार ४३१ त्यामुळे पावसाळ्यात नियोजित वेळी पाऊस नाही झाला तर पाणीटंचाईचे संकट उद्भवण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सध्या जिल्ह्याच्या ग्रामीण भागात भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. ५०० गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मे अखेरीस पाणीटंचाई अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. उन्हाळ्यातील पाणीटंचाईचे संकट लक्षात घेत जिल्हा प्रशासनाकडून पाणीपुरवठ्यासाठी ७कोटी, ७० लाखांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. जिल्ह्यातील ४८४ गावे आणि ५६७ वाड्यांत पाणीटंचाई गृहीत धरत प्रशासनाने कृती आराखडा तयार केला होता. जिल्हा प्रशासनाकडून पाणी जपून वापरण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.

धरण समुह                  उपयुक्त पाणीसाठा टक्के
गंगापूर धरण ३४३१           ३३.७५%
पालखेड धरण समुह १०६३   १२.७९%
ओझरखेड धरण समुह ५२५  १६.३७%
दारणा ६४१६                   ३३.९५%
भोजापूर ०                        ०%
गिरणा खोरे धरण समुह ६४८७  २८.१३%
पुनद ७००                        ४२.६४%
एकूण १८६२४                     २८.३६%

संख्या क्षमता उपयुक्त पाणीसाठा
मोठे प्रकल्प ७ ४८००४
मध्यम प्रकल्प १७ १७६६०
एकूण २४ ६५६६४ (२८.३६%)

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

सिंदूर

ऑपरेशन सिंदूर थांबताच जम्मु-काश्मीरच्या त्राल, शोपियांमध्ये ४८ तासांत ६ दहशतवाद्यांचा खात्मा;...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi ऑपरेशन सिंदूर स्थगित केल्यानंतर भारतीय सुरक्षा यंत्रणांनी जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे सर्च ऑपरेशन राबविण्यास सुरुवात केली होती. दोन ऑपरेशनमध्ये गेल्या...