Friday, April 25, 2025
HomeनाशिकNashik News : जिल्ह्याला पाणीटंचाईचे चटके; पाच तालुक्यांत १४ टँकरने पाणीपुरवठा

Nashik News : जिल्ह्याला पाणीटंचाईचे चटके; पाच तालुक्यांत १४ टँकरने पाणीपुरवठा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

जिल्ह्यातील ग्रामीण भागात (Rural Area) पाणीटंचाईचे (Water Shortage) चटके जाणवू लागले आहेत. पाच तालुक्यात चौदा टँकरद्वारे तहान भागवली जाणार आहे. दिवसागणिक उन्हाचा पारा वाढू लागल्यामुळे धरणांतील (Dam) पाणीसाठ्याबरोबरच जिल्ह्यातील काही भागात भूजल पातळी घटली आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाणीटंचाईचे संकट दिवसेंदिवस गडद होत आहे.

- Advertisement -

एप्रिल महिन्यांच्या (April Month) दुसऱ्या आठवड्यातच पाच तालुक्यातील (Five Taluka) वाड्या, वस्त्यांवर, गावात पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवू लागले आहे. जिल्ह्यातील इगतपुरी, सिन्नर, येवला, सुरगाणा आणि पेठ या तालुक्यात टँकर (Tankers) सुरू करण्यासाठी प्राप्त झालेल्या प्रस्तावांना जिल्हा प्रशासनाने मंजुरी दिली आहे.

अशी आहे स्थिती

इगतपुरीत तालुक्यात (Igatpuri Taluka) एक टँकरद्वारे वाळविहीर, पायरवाडी, तळ्याचीवाडी, बैरोबावाडी येथे पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. सिन्नर तालुक्यात दोन टँकरद्वारे पिंपळे येथील मोनखिंड व पाताळी वस्ती, सदगीर वस्ती, बिन्नर वस्ती येथे पाणीपुरवठा केला जाणार आहे. येवला तालुक्यात सर्वाधिक ९ टँकर सुरु होणार आहेत. यात आहेरवाडी, राजापूर, अलगटवस्ती, वाघ वस्ती, हवालदार वस्ती, विंचू वस्ती यासह एकूण १८ वाड्या वस्त्यांवर पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. सुरगाणा व पेठ तालुक्यात प्रत्येकी १ टँकर सुरू करण्यात येणार आहे.

सात कोटींचा आराखडा

गतवर्षीच्या पाण्याच्या टंचाई लक्षात घेऊन, जिल्ह्यातील ४८४ गावे अन् ५६७ वाड्यांना पाणीटंचाई जाणवण्याची शक्यता जिल्हा प्रशासनाद्वारे गृहित धरण्यात आली आहे. त्यानुसार कृती आराखडा तयार केला आहे. त्या अंतर्गत ४६ गावांमध्ये विंधनविहीर आणि १४६ गावांमध्ये खासगी विहिरी अधिग्रहित करण्यात येणार आहेत. ८१४ ठिकाणी टँकर आणि बैलगाडीद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी ७कोटी ७० लाख रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

शासकीय

Nashik News: शासकीय कार्यालकांकडे थकला कोट्यावधी रुपयांचा कर; मनपासमोर थकबाकी वसुलीचे...

0
नाशिक | प्रतिनिधी नाशिक मनपा कर विभाग सामान्य नागरिकांची घरपट्टीची थकबाकी वसूल करण्यासाठी त्यांच्या मालमत्तांचा लिलाव करण्याची तयारी करीत आहे. मात्र दुसरीकडे शासकीय कार्यालयांकडेच मनपाची...