Tuesday, March 25, 2025
HomeनाशिकNashik News : 'स्मार्ट सिटी' स्मार्ट काम करेल का?

Nashik News : ‘स्मार्ट सिटी’ स्मार्ट काम करेल का?

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक शहराला स्मार्ट करण्यासाठी आलेल्या स्मार्ट सिटी कंपनीला देण्यात आलेल्या मुदत वाढीनंतरही कामात स्मार्टपणा दिसून येत नाही. मागील कार्यकाळात सातत्याने मुदतवाढ दिल्यानंतर ही अजून कामांमध्ये दिरंगाई होत असल्यामु‌ळे नागरिक मुदतवाढीबाबत शंका उपस्थित करीत आहे. नाशिकला स्मार्टसिटीला दोनवेळा मुदतवाढीनंतरही कामे प्रलंबित असल्याने पुन्हा ‘स्मार्ट’ कामाच्या पूर्ततेसाठी मुदतवाढीची तयारी सुरू आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

- Advertisement -

नाशिक शहराला स्मार्ट करण्यासाठी केंद्र सरकारने दिलेल्या एक हजार कोटी रुपयांच्या कामांपैकी ९३० कोटी रुपये खर्चाचे २१ प्रकल्प हाती घेण्यात आले होते. त्यापैकी १०० कोटी रुपये खर्चाचे ६ ते ७ प्रकल्प अजूनही पूर्णत्वाच्या दिशेने संथ गतीने वाटचाल करीत आहेत. नाशिक शहरासाठी ही दुर्दैवाची बाब मानली जात आहे. यातून स्मार्ट सिटीला पुन्हा मुदत वाढीची अपेक्षा आहे किंवा कसे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

नाशिक शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता गुन्हेगारी आळा घालण्यासाठी व वाहतुकीला शिस्त लावण्याच्या प्रामाणिक हेतूने शहरभरात सीसीटीव्हीचे जाळे उभारण्यात आले होते. या कामालाही ७ वर्षाचा कालावधी अपुरा पडला आहे. अजूनही शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित झाले नसल्यामुळे सीसीटीव्ही सुरू होण्यापूर्वीच मुदतबाह्य होतील काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे. प्रत्येक चौकात सिग्नलवर स्मार्ट सिटीच्या वतीने सीसीटीव्ही उभारणीसाठी बीएसएनएलचा खोडा असल्याचे बोलले जात आहे. बीएसएनएलच्या माध्यमातून त्यांना इंटरनेट कनेक्शन देण्याचे कंत्राट दिले आहे. त्यांनी ते वेळेत उभारणे गरजेचे आहे.

दिवाळी आणि पावसाळ्यात खोदकाम करण्याला मनाई होती.मात्र, दिवाळीपासून पुढच्या दिवाळीपर्यंतच्या या कालावधीत बीएसएनएल रस्ते खोदण्यात उसंत मिळाली नसल्याने हा प्रश्न प्रलंबित असल्याचे बोलले जात आहे. बीएसएनएलच्या वतीने रस्ता फोडण्यासाठी महापालिका आणि नागरिकांनी विरोध नोंदवला आहे. यानिमित्ताने शासकीय यंत्रणातील समन्वयाचा अभाव विकासकामांना कुठे घेऊन जाणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या प्रलंबित असलेल्या कामांमध्ये मलजल प्रक्रिया प्रकल्पांचा विकास करणे, महानगरपालिकेने सुचित के लेल्या ब्लॅक स्पॉटवर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची उभारणी करणे, व्यावसायिक स्थानांवर स्काडा मीटर लावून पाण्याच्या वापराची थेट माहिती उपलब्ध ऑनलाईन उपलब्ध करून घेणे, शहरात उभारण्यात आलेल्या ४ जल कुंभाचे थेट कनेक्शनला जोडणे व शहराच्या पाण्याच्या उपलब्धतेवर नियोजन करणे अद्याप प्रलंबित आहेत.

नाशिक ‘स्मार्ट’ झाले का?

विविध ठिकाणाच्या विकासकामांना गती देण्यासाठी शहराला स्मार्ट मरर्नयाच्या दृष्टीने केंद्र सरकारने थर्ड पार्टी एजन्सीची नेमणूक केली होती. मात्र, त्यातून शहराचा विकास अतिशय संथ गतीने होत असल्याने स्मार्ट सिटीच्या विकासकामांमुळे नाशिक खरेच स्मार्ट झाले का? असा प्रश्न नाशिककर उपस्थित करीत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

default-featured-image

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी तेलंगणा येथून...