Tuesday, July 7, 2026
Homeक्राईमNashik News : शेतात काम करताना सर्पदंशाने महिलेचा मृत्यू

Nashik News : शेतात काम करताना सर्पदंशाने महिलेचा मृत्यू

नगरसूल | वार्ताहर | Nagrsul

येथील बारवाचा मळा परिसरातील रहिवासी असलेल्या एका शेतकरी महिलेचा (Farmer Woman) शेतात काम करत असताना सर्पदंशाने (Snakebite) मृत्यू (Death) झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी घडली. लताबाई बबन पैठणकर (वय ६०) असे मृत महिलेचे नाव आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, गुरुवारी दुपारी लताबाई पैठणकर या घराजवळील शेतात एकट्याच काम करत होत्या. घरातील इतर सर्व सदस्य काही कामानिमित्त बाहेर गेलेले होते. शेतात काम करत असतानाच त्यांना अचानक विषारी सापाने चावा घेतला. सर्पदंश झाल्याचे लक्षात येताच त्यांना तातडीने उपचारासाठी हलवण्यात आले. लताबाई यांना सर्वप्रथम स्थानिक डॉ. शांताराम बागल यांच्या दवाखान्यात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना नगरसूल (Nagarsul) येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले.

मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने तेथेही प्राथमिक उपचार करून तातडीने रुग्णवाहिकेने येवला येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात (Rural Hospital) हलवण्यात आले. परंतु, दुर्दैवाने येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. मृत लताबाई यांच्या पश्चात पती बबनराव त्र्यंबक पैठणकर, एक मुलगा आणि नातवंडे असा परिवार आहे. एका कष्टकरी शेतकरी कुटुंबातील महिलेचा अशा अपघाती निधनाने पैठणकर परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, नगरसूल परिसरात शोककळा पसरली आहे.

ताज्या बातम्या

Bhandardara : भंडारदरा, मुळा पाणलोटात पुनर्वसु सरींचे तांडव

0
भंडारदरा धरण निम्मे भरण्याच्या मार्गावर वाकी ओव्हरफ्लो, निळवंडेत आवक वाढली भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara उत्तर नगर जिल्ह्याची भाग्यरेखा असलेल्या भंडारदरा धरण पाणलोटात पुर्नवसु नक्षत्रांच्या सरींचे तांडव सुरू असल्याने...