देवळाली कॅम्प | वार्ताहर | Deolali Camp
येथील शिंगवेबहुला (Shingwebhula) आंबाडवाडी येथे महाप्रसाद वाटप करत असताना मंदाबाई बाळासाहेब पाळदे या महिलेला सोन्याची पोत (Gold Mangalsutra) अंदाजे किंमत सव्वा लाख रुपये सापडली होती. त्यानंतर या महिलेने कुठलाही मोह न ठेवता पंच कमिटीला माहिती देत दुसरी महिला हौसाबाई नथु गवळी यांना परत केली. त्यामुळे मंदाबाई पाळदे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कॅन्टाेन्मेन्ट बोर्ड वाॅर्ड क्र ७ मधिल शिगवे बहूला आंबडवाडी गावात (Ambadwadi Village) खंडेराव महाराज याञा उत्सव निमित्त गावांतील दुध संघाच्या वतीने गावातील मारुती मंदिरात महाप्रसादाचे (भंडारा) आयोजन करण्यात आले होते. यावेळी गावातच महाप्रसाद असल्याने एकच गर्दी झाली होती, त्यातच हौसाबाई नथु गवळी यांची सोन्याची पोत हरवली असता तिच पोत मंदाबाई पाळदे यांना सापडली. यानंतर त्यांनी क्षणाचाही विलंब न करता आपले पती बाळासाहेब संतू पाळदे यांना माहिती दिली. त्यानंतर त्यांनी त्वरित पंच कमिटीला सांगितले असता गावातील जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अशोकराव मोजाड यांनी दुसर्याच दिवशी गावातील नागरिकांना (Citizen) मंदिरातील सार्वजनिक ध्वनिक्षेपकव्दारे आव्हान केले असता सोन्याची पोत हौसाबाई नथु गवळी यांची असल्याचे समजले.
यावेळी संपूर्ण ग्रामस्थांच्या प्रमुख उपस्थितीत हौसाबाई गवळी यांना मंदाताई बाळासाहेब पाळदे यांच्या हस्ते त्याठिकाणी सापडली त्याच ठिकाणी त्यांना सोन्याची पोत सुपूर्त करत त्यांच्या हाती स्वाधीन करण्यात आली. यावेळी त्या मातेचा चेहरा अतिशय आनंदी झाला होता, याप्रसंगी गावातील ग्रामस्थ पंच कमिटी दुध संघाचे वतीने बाळासाहेब पाळदे व मंदाताई पाळदे या दाम्पत्यांचा सत्कार करण्यांत आला. यावेळी जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अशोकराव मोजाड, शिवसैनिक बाळासाहेब बेरड, विठ्ठल मेढे, बाळासाहेब मोजाड, रामदास बेरड, एकनाथ निसाळ, विलास वावरे, संजय निसाळ, फुल्याबाई गावंडे , मिनाबाई खडांगळे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. याबद्दल देवळाली कॅम्प पोलिस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांनी देखील या परिवाराचे अभिनंदन केले.