Friday, July 24, 2026
HomeनाशिकNashik News : मासे पकडण्यास गेलेल्या तरुणाचा तलावात बुडून मृत्यू

Nashik News : मासे पकडण्यास गेलेल्या तरुणाचा तलावात बुडून मृत्यू

त्र्यंबकेश्वर | वार्ताहर | Trimbakeshwar

विल्होळी (Vilholi) येथील तलावात (Lake) काल (बुधवार) एक ३२ वर्षीय तरुण आपल्या मित्रांसह मासे पकडण्यासाठी गेला असता त्याचा बुडून मृत्यू (Death) झाला आहे. त्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, लक्ष्मण दशरथ जाधव रा. विल्होळी असे मयत तरुणाचे (Youth) नाव आहे. काल (बुधवार) दुपारी आपल्या मित्रांसह मासेमारी करण्यासाठी विल्होळी येथील तलावावर लक्ष्मण गेला होता. यावेळी त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो खोलवर जाऊन बुडाला.

त्यानंतर रात्री पोहणाऱ्या व्यक्तींच्या मदतीने त्याचा शोध घेण्यात आला. मात्र, अंधार झाल्यामुळे शोध लागला नाही. यानंतर आज (गुरुवार) सकाळी त्याचा फुगलेला मृतदेह (Dead Body) पाण्यात फुगून वर आला. यानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आला.

दरम्यान, या शोध मोहिमेच्या वेळी डीवायएसपी वासुदेव देसले, मृदुला नाईक यांच्यासह नाशिक तालुका पोलीस (Nashik Taluka Police) कर्मचारी उपस्थित होते. याप्रकरणी अधिक तपास विल्होळी पोलीस (Police) करत आहे.

ताज्या बातम्या

संपादकीय : २४ जुलै २०२६ – युवकांचा आक्रोश अन् राजकारणाचा बनाव

0
वैद्यकीय प्रवेशाच्या नीट परीक्षा पेपरफुटीचे पडसाद निकाल किंवा न्यायालयाच्या कक्षांपुरते मर्यादित न राहता, थेट देशातील रस्त्यारस्त्यांवर उमटले आहेत. लाखो तरुणांचे भविष्य अंधारात ढकलले गेल्याच्या...