Friday, September 4, 2026
HomeनाशिकNashik News : वळूची मोटारसायकलला धडक; तरुणी गंभीर जखमी

Nashik News : वळूची मोटारसायकलला धडक; तरुणी गंभीर जखमी

मनमाड | प्रतिनिधी |Manmad

- Advertisement -

पळत सुटलेल्या वळूची (बैल) दुचाकीवरून जाणाऱ्या तरुणीला (Young Woman) जबर धडक दिल्याची घटना आज (गुरुवार) सकाळी शहरातील दत्त मंदिर रोडवर (Datta Mandir Road) घडली. दरम्यान वळूने दिलेली धडक इतकी जबर होती की तरुणी रस्त्यावर कोसळून बेशुद्ध झाली.

यानंतर तिला तातडीने रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले. वळूने दिलेल्या धडकेचा थरार सीसीटीव्हीत (CCTV) कैद झाला असून, या घटनेमुळे शहरातील मोकाट जनावरांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, तेजस्विनी देवगीर ही तरुणी दुचाकीवरून (Two-Wheeler) जात असताना मंदिर रोडवरील सप्रे कॉलनीच्या एका गल्लीतून एक वळू सुसाट वेगाने धावून आला आणि काही कळण्याच्या आत त्याने दुचाकीला जोरदार धडक दिली.

दरम्यान, ही धडक इतकी भीषण होती की, तरुणी दुचाकीसह रस्त्यावर कोसळून बेशुद्ध झाली. यावेळी तिच्या डोक्याला आणि खांद्याला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी (Citizen) घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य करत तरुणीला रुग्णालयात दाखल केले.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : 38 शिवभोजन चालकांसाठी सव्वा कोटी मंजूर

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar गरिबांना अवघ्या 10 रुपयांत पोटभर जेवण उपलब्ध करून देणार्‍या शिवभोजन थाळी योजनेला नगर जिल्ह्यात प्रतिसाद मिळत असला, तरी या योजनेचे केंद्रचालक मात्र,...