Saturday, April 26, 2025
HomeनाशिकNashik News : इव्हेंटच्या कामासाठी आलेल्या युवकाचा पडल्यामुळे मृत्यू

Nashik News : इव्हेंटच्या कामासाठी आलेल्या युवकाचा पडल्यामुळे मृत्यू

इगतपुरी | प्रतिनिधी | Igatpuri

येथील तळेगाव शिवारात (Talegaon Shivar) असलेल्या एअर मकाऊ व्हिला येथे इव्हेंटच्या कामासाठी आलेल्या २५ वर्षीय युवक (Youth) मध्यरात्रीच्या सुमारास चक्कर येऊन पडल्याने त्याला रूग्णालयात (Hospital) उपचारासाठी नेले असता वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून मयत घोषित केले.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik News : जिल्ह्यात डेंग्यूचा कहर; सात महिन्यांत ‘इतके’ रुग्ण, तिघांचा मृत्यू

याबाबत अधिक माहिती अशी की, शनिवार (दि.१०) रोजी रात्री ३ वाजेच्या सुमारास तळेगाव शिवारात असलेल्या पंचतारांकीत हॉटेल परिसरात असलेल्या एअर मकाऊ व्हिला येथे इव्हेंटच्या कामासाठी आलेला आशुतोष बाळासाहेब एखंडे, (वय २५) रा. ज्ञानेश्वरनगर, कस्तुरी पार्क, पाथर्डी फाटा, नाशिक याला अचानक मळमळ झाल्याने तो बेडवरून उठुन बसला. काही वेळाने उलटी होऊन अस्वस्थ वाटत असल्यामुळे व्हिलातुन लिंबु पाणी मागवुन पिल्याने चक्कर येवुन बेडच्या बाजुला खाली पडल्यामुळे त्याच्या डोक्याच्या डाव्या बाजुला दुखापत झाल्याने तो बेशुध्द झाला.

हे देखील वाचा : Nashik Rain News : नाशकात पावसाची हजेरी

दरम्यान, ही घटना त्याच्यासोबत असलेला त्याचा मित्र राहुल मधुकर चव्हाण, रा. नाशिक याने पहाताच आशुतोषला तातडीने जिल्हा रूग्णालयात (District Hospital) उपचारासाठी नेण्यात आले. यावेळी वैद्यकीय विभागाने आशुतोष याला तपासून मयत घोषित केले. याबाबत इगतपुरी पोलीस ठाण्यात (Igatpuri Police Station) अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल तसरे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ह. आर एस.जाधव, मोरे, सचिन मुकणे आदी करीत आहे .

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

पहलगाम

मोठी बातमी! पहलगाम हल्ल्याप्रकरणी TRF संघटनेचा घुमजाव; आधी हल्ल्याची जबाबदारी स्विकारली...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे मंगळवारी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात २६ पर्यटक ठार झाले. तर जे स्थानिक मदतीसाठी धावले, त्यांनाही...