Saturday, August 29, 2026
HomeनाशिकNashik News : दमणगंगेच्या पुराने घेतला तरूणाचा बळी

Nashik News : दमणगंगेच्या पुराने घेतला तरूणाचा बळी

पेठ | वार्ताहर | Peth

- Advertisement -

गत सप्ताहापासून पडत असलेल्या पावसाने (Rain) पेठ तालुक्यातील (Peth Taluka) नदी, नाले दुथडी भरून वाहत आहेत. मात्र, यामध्येच तालुक्यात एक दुर्दैवी घटना घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील धानपाडा (Dhanpada) येथील गणपत गंगा कोदी (वय ४३) हा युवक (Youth) शेतकरी शेतीची कामे आटोपून सायंकाळी ७. ३० वाजता घराकडे परत येत असतांना दमण गंगेच्या (Daman Ganga) तीव्र प्रवाहात दोन दिवसापूर्वी वाहून गेला होता.

त्यानंतर ही बाब नातेवाईक यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी रात्रभर शोध कार्य केले. मात्र, रात्रीचा अंधार व पाण्याच्या प्रवाहाने शोध कामात मोठ्या समस्या निर्माण झाल्या होत्या. तेव्हापासून नातेवाईक (Relatives) व ग्रामस्थांकडून त्याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू होते.

दरम्यान, यानंतर आज (गुरुवार) दुपारी २.३० वाजेच्या सुमारास गणपत कोदी याचा मृतदेह (Dead Body) खामशेत जवळील निसदा या जागी आढळून आला. याबाबत तलाठी यांनी तहसीलदार यांना दिलेल्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

सूर्यकुमार

‘विश्वचषक जिंकलो, मग बदल का?’; कॅप्टनसी गेल्यानंतर सूर्यकुमार यादवने अखेर मौन...

0
मुंबई | Mumbaiभारताचा टी-२० विश्वचषक विजेता कर्णधार सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) अखेर या वर्षीच्या सुरुवातीला विश्वचषक जिंकल्यानंतर लगेचच राष्ट्रीय संघातून वगळल्याबद्दल मौन सोडले आहे....