Monday, September 14, 2026
HomeनाशिकNashik News : विजेचा धक्का लागून तरुणाचा मृत्यू; स्विमिंग पूलात उडी मारताना...

Nashik News : विजेचा धक्का लागून तरुणाचा मृत्यू; स्विमिंग पूलात उडी मारताना घडली घटना 

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

कुटुंबासह सुट्टीचा आनंद घेण्यासाठी रिसॉर्टवर गेलेल्या एका तरुणाचा (Youth) वीजेचा तीव्र धक्का (इलेक्ट्रिक शॉक) लागून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. नाशिक तालुक्यातील गंगापूर गाव-गोवर्धन शिवार परिसरातील समृद्ध रिसॉर्ट येथे ही घटना घडली. तेजस संजय जगताप (वय २७, रा. गायकवाड काॅम्प्लेक्स, शिवाजीनगर, सातपूर) असे ​मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. 

- Advertisement -

नाशिक तालुका पाेलीस ठाण्याच्या (Nashik Taluka Police Station) माहितीनुसार, तेजस व कुटुंबाने ११ सप्टेंबर रोजी रिसाॅर्ट बूक केले हाेते. यानंतर, तेजस हा रात्री बारा ते पहाटे तीनच्या दरम्याम स्विमिंग पूलमधे पोहण्यासाठी व उडी मारण्यासाठी तो शेजारील पत्र्यावर चढला. उडी मारण्याच्या तयारीत असतानाच तेथून जाणाऱ्या एमएसईबीच्याच्या (महावितरण) उच्च विद्युत दाबाच्या वायरचा त्याला स्पर्श झाला. ​विजेचा धक्का बसल्याने तो गंभीर जखमी होऊन बेशुद्ध पडला. त्यानंतर पहाटे तीन वाजताच्या सुमारास त्याला उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मात्र, वैद्यकीय अधिकारी डॉ. गावित यांनी मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच नाशिक तालुका पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक मृदुला नाईक यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेची पाहणी केली व आवश्यक ती माहिती घेतली. या प्रकरणी नाशिक तालुका पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्युच्या (Death) घटनेची नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे जगताप कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

ताज्या बातम्या

Amit Shah : प्रत्येक प्रादेशिक भाषा समृद्ध करणे हेच केंद्र सरकारचे...

0
मुंबई | Mumbai सहाव्या अखिल भारतीय राजभाषा संमेलनाचे ( Official Language Conference) आणि हिंदी दिवसाचे औचित्य साधून देशाची आर्थिक राजधानी मुंबईत आयोजित कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री...