Monday, August 31, 2026
Homeक्राईमNashik News : गोदापात्रात बुडून तरुणाचा मृत्यू; पेठरोड परिसरावर शोककळा

Nashik News : गोदापात्रात बुडून तरुणाचा मृत्यू; पेठरोड परिसरावर शोककळा

पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati

- Advertisement -

गोदापार्क परिसरातील (Goda Park Area) जॉगिंग ट्रॅकजवळ गोदावरी नदीच्या पात्रात बुडून एका ३२ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू (Death) झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी (२६ ऑगस्ट) दुपारी उघडकीस आली. शुभम मारुती पवार (वय ३२, रा. प्रथम रो बंगलो, समर्थ नगर, पेठ रोड, शरद पवार मार्केट यार्डामागे) असे मृत तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास शुभम पवार हा तरुण (Youth) गोदापार्क नदीपात्रात जॉगिंग ट्रॅकजवळ पाण्यात बेशुद्ध अवस्थेत आढळून आला होता. ही बाब निदर्शनास येताच त्याचा आतेभाऊ निलेश नंदू गुंजाळ यांनी स्थानिकांच्या मदतीने त्याला तातडीने पुढील उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात (Civil Hospital) दाखल केले.

मात्र, तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. गांगुर्डे मॅडम यांनी तपासून शुभम यास मृत घोषित केले.या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात (Panchvati Polie Station) अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तरुणाच्या अचानक जाण्याने समर्थ नगर व पेठ रोड परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस हवालदार एस. एस. बाविस्कर या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

ताज्या बातम्या

नाशिक जिल्ह्यातील प्रारूप मतदार यादी जाहीर – जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

0
नाशिक, दि. 31 ऑगस्ट (जिमाका वृत्तसेवा) : Nashik नाशिक जिल्ह्यातील प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात आली असून या मतदार यादीत नाव समाविष्ट नसलेल्या पात्र मतदारांनी...