सिन्नर | प्रतिनिधी | Sinnar
घरगुती वादातून (Domestic Dispute) माहेरी निघून गेलेल्या पत्नीला (Wife) आणण्यासाठी गेलेल्या पतीने स्वतःच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून स्वतःला पेटवून घेतले. यानंतर सासूसह पत्नीलाही मिठी मारल्याची घटना रविवारी (दि.६) मध्यरात्री १२ च्या दरम्यान तालुक्यातील सोनारी येथे घडली. या घटनेत गंभीर भाजल्याने पतीचा मृत्यू (Death) झाला असून त्याच्या पत्नीसह सासू मृत्यूशी झुंज देत आहेत.
तालुक्यातील शिंदेवाडी (ShindeWadi) येथील केदारनाथ दशरथ हांडोरे (२४) याचा सोनारीतील स्नेहल (१९) हिच्याशी विवाह झाला होता. काही दिवसांपूर्वी झालेल्या घरगुती वादातून स्नेहल माहेरी सोनारी येथे आईक डे येऊन रहात होती. तिला आणण्यासाठी केदारनाथ हा त्याचे मित्र हरीश डुंबरे, कृष्णा थोरात, गणेश बोरात, विशाल तुपसुंदर यांच्यासमवेत सोनारीतील घरी गेला होता.
स्नेहल हिला सासरी पाठवण्यावरुन सासू अनिता शिंदे सोबत त्याचा किरकोळ वाद झाला. त्यावेळी केदारनाथ याने तिच्या आईसोबत झटापट करत स्नेहल हिचे तोंड दाबून त्यांना चाकूचा धाक दाखवला व मित्रांच्या सोबतीने पत्नीला पळवून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात यश न आल्याने केदारनाथ याने स्वतःला पेटवून घेतले. त्याच अवस्थेत सासूबाईला (Mother-in-law) मिठी मारली.
त्यात केदारनाथ गंभीर भाजल्यानंतर त्याला तातडीने नाशिकला खासगी रुग्णालयात (Private Hsopital) दाखल करण्यात आले होते. मात्र, सोमवार (दि.७) रोजी दुपारी १२ च्या सुमारास त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर सासूबाई व पत्नी स्नेहल ह्या दोघीही गंभीर भाजल्या आहेत. त्यांच्यावरही उपचार सुरु असून पोलिसांनी केदारनाथ याच्यासह त्याच्या चारही मित्रांच्या विरोधात धाक दाखवून पळवून नेण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक संजय वाघमारे पुढील तपास करीत आहेत.