Friday, November 22, 2024
Homeनाशिकअण्णा, काका, की भाऊ येणार! कोण धक्का देणार, कोण विजयी होणार?

अण्णा, काका, की भाऊ येणार! कोण धक्का देणार, कोण विजयी होणार?

मतदान आटोपले, समर्थकांना निकालाची उत्कंठा

निफाड | प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीचे मतदान आटोपले परंतु आता खरी रंगत पारापारावर म्हणा की चहाच्या टपऱ्यांवर नागरिकांच्या बोलण्यातून सुरू झाली ती नागरिकांना थंडीची चाहूल लागल्याने काही ठिकाणी शेकोट्या पेटू लागल्या आहे व या शेकोट्यांवरही २३ तारखेला निवडून कोण येणार? संपूर्ण निफाड मतदारसंघात हा चर्चेचा विषय होत आहे. अण्णा येणार! काका येणार! की भाऊ धक्का देणार !! यावरच आता चर्चा सुरू झाल्या आहे.

२०१९ च्या निवडणुकीपेक्षा जवळपास दोन टक्के मतदान या निवडणुकीत कमी झाले आहे. मागील निवडणुकीत ७५.१४ इतकी मतदानाची टक्केवारी होती तर या निवडणुकीत ७३.१२ इतके मतदान झाल्याने दोन टक्के कमी मतदानाचा फटका विद्यमान आमदारांना बसतो की याचा फायदा माजी आमदारांना होतो, याचेच अंदाज आता नागरिक चवीचवीने आपापल्या तर्कानुसार लावत असल्याने जिकडे तिकडे बघायला फक्त निवडणुकीचा विषय.

- Advertisement -

हा होणार नाही, तो होणार नाही, हे सुरु असल्याने राजकीय निरीक्षकांच्या या चर्चेने माना उंचावल्या आहे. कारण की जेथे रवी तेथे कवी असे म्हटले जाते परंतु कुठलाही अद्यापद्या नसलेले राजकीय निरीक्षक असलेले नागरिक म्हणा की तरुण आपापले अंदाजानुसार हाच उमेदवार निवडून येणार, त्याने हे केले नाही, त्यांनी ते केले नाही, त्याचा तोटा त्याला होणार, असे अंदाज वर्तवत असल्याने राजकीय कार्यकर्ते व राजकीय पदावर कार्यरत असणाऱ्या राजकीय नेतृत्वाला यामुळे विजयाचा अंदाज बांधणे या पंचवार्षिक निवडणुकीत अवघड झाले आहे.

हे ही वाचा: Maharashtra Assembly Elections: मालेगाव बाह्यच्या निकालाची उत्कंठा शिगेला

अनेक ठिकाणी किरकोळ अपवाद वगळता निफाड तालुक्यात मतदान शांततेत झाले. परंतु सत्ताधारी व विरोधक यांनी आपापल्या पद्धतीने मतदार राजाला आकृष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आजी-माजी समर्थक आपलाच उमेदवार विजयी होणार या अविर्भावात आपापल्या प्रचार कार्यालयात अंदाज बांधत आहे. परंतु मतदार राजा कोणालाच खरे मत देत नसल्याने उमेदवार मात्र आपल्या समर्थकांना फोनाफानी करून परिस्थितीचा अंदाज घेत आहे. तर लाडकी बहीण कोणाला पावली, हे निकालावरूनच स्पष्ट होणार आहे.

निफाड मतदार संघात संपूर्ण आकडेवारी बघितली किंवा मतदार राजाच्या गर्दीवर नजर टाकली असता लाडक्या बहिणींची गर्दीच संपूर्ण मतदारसंघात दिसून आल्याने लाडकी बहीण कोणाला आपला भाऊ म्हणून पसंती देते व आपले बहुमूल्य मतदान त्याच्या झोळीत टाकते, यावरच विजयी उमेदवाराचे भवितव्य व राजकीय पुनर्वसन अवलंबून आहे. पुढील निवडणुकीत अनेक नवीन चेहरे म्हणा की गुडघ्याला बाशिंग बांधून थांबलेले उमेदवार पुढील विधानसभा निवडणुकीत थांबणार नाही. त्यामुळे आजी-माजी मध्ये ज्याही उमेदवाराचा या निवडणुकीत पराभव होणार आहे, त्याचे राजकीय भवितव्य अधांतरी असल्याचा अनेक राजकीय निरीक्षकांनी अंदाज सांगितला आहे. २३ रोजी निफाड मतदार संघाचा भावी लोकप्रतिनिधी कोण, याचे अंदाज नागरिक शेकोटीवर करत आहे. परंतु मतदार राजाने आपले काम २० नोव्हेंबर रोजी मतदान पेटीत टाकले आहे. त्यामुळे निफाड विधानसभा आमदार हा हाती मशाल घेऊन फिरतो की घड्याळाची टिकटिक लावत निफाडचा चौफेर विकास करतो, हे बॅटचे चौकार व षटकार कोठे कोठे पडले, यावरच मशाल व घड्याळाचे भविष्य ठरणार आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या