Saturday, September 28, 2024
HomeनाशिकNashik Niphad News : खराब रस्त्यामुळे कांद्याने भरलेला ट्रॅक्टर पलटी; शेतकऱ्याचे मोठ्या...

Nashik Niphad News : खराब रस्त्यामुळे कांद्याने भरलेला ट्रॅक्टर पलटी; शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान

निफाड | प्रतिनिधी | Niphad

नाशिक-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील (Nashik-Chhatrapati Sambhajinagar Highway) निफाड शहराच्यापुढे असलेल्या आचोळा नाल्यात आज सकाळी कांद्याचा (Onion) भरलेला ट्रॅक्टर (Tractor) खराब रस्त्यामुळे पलटी झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे (Farmer) मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : नाशिकमध्ये क्रांतीसूर्य महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या भारतातील सर्वात मोठ्या अर्धाकृती ब्राँझ धातूच्या शिल्पाचे आज लोकार्पण

याबाबत अधिक माहिती अशी की, धारणगाव येथील कांदा उत्पादक शेतकरी रामेश्वर पंढरीनाथ जाधव हे निफाड उपबाजारात (Niphad Sub Market) कांद्याला चांगला भाव मिळतो म्हणून कांदा लिलावासाठी घेऊन जात होते. यावेळी त्यांचा ट्रॅक्टर शिवरे फाटा ते निफाड शहर या रस्त्याने जात असताना या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे त्यांच्या ट्रॅक्टरची कांद्याने भरलेली ट्रॉली पलटी झाली. परंतु, सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. रस्त्याच्या या दयनीय अवस्थेमुळे घटस्थापनेच्या अगोदर जाधव परिवारावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भोंगळ कारभारामुळे जीवावर बेतले असते. ‌

हे देखील वाचा : युवा शेतकऱ्याला ‘आदर्श डाळिंब उत्पादक शेतकरी पुरस्कार’

दरम्यान, संपूर्ण कांदा गत दहा दिवसापासून परतीच्या पावसाची (Rain) रिपरिप सुरू असल्याने पाण्यात व चिखलात भिजल्याने कांद्याचे व ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचे नुकसान झाले. परंतु, याची कदर ना प्रशासनाला आहे ना सार्वजनिक बांधकाम विभागाला ना लोकप्रतिनिधींना आहे. त्यामुळे या नुकसानीची जबाबदारी घेऊन सार्वजनिक बांधकाम विभाग व प्रशासनावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी कांदा उत्पादकांनी (Onion Growers) दैनिक देशदूतकडे केली आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या