Friday, January 23, 2026
HomeनाशिकNashik NMC Election : महापालिकेच्या १२२ जागांसाठी तब्बल २,३५७ उमेदवारी अर्ज दाखल;...

Nashik NMC Election : महापालिकेच्या १२२ जागांसाठी तब्बल २,३५७ उमेदवारी अर्ज दाखल; आज छाननी

शेवटच्या दिवशी आले इतके' अर्ज

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक महापालिका निवडणूकीसाठी (Nashik NMC Election) उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया २३ डिसेंबरपासून सुरू झाली होती. तर मंगळवार (दि.३०) शेवटचा दिवस होता. मागील सहा दिवसांत शहरातील ११२ जागांसाठी तब्बल २,३५७ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत, जे ऐतिहासिकदृष्ट्या महापालिकेसाठी सर्वाधिक उमेदवारी अर्ज ठरले आहेत. शेवटच्या दिवशी अजून १,३३१ अर्ज दाखल झाले आहेत.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik BJP Politics : नाशकात भाजपमध्ये मोठा राडा; एबी फॉर्मवरून वाद, कार्यकर्ते आक्रमक

YouTube video player

मोठ्या संख्येने अर्ज दाखल झाल्याने यंदाची निवडणूक (Election) चुरशी होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. शहरातील अनेक प्रभागांमध्ये एका जागेसाठी दहा ते पंधरा उमेदवार रिंगणात असून, स्थानिक प्रश्न, विकासकामे यावर आधारित लढतीची, शक्यता आहेत. प्रमुख राष्ट्रीय व प्रादेशिक राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारही मोठ्या संख्येने निवडणूक रिंगणात उतरल्याने मतदारांसमोर पर्यायांची संपन्नता निर्माण झाली आहे. भाजप स्वतंत्रपणे मतदानात उतरली आहे आणि विविध प्रभागांमध्ये आपले पॅनल जाहीर केले आहे.

हे देखील वाचा : Nashik BJP Politics : माजी नगरसेवक उद्धव निमसेंच्या मुलाला भाजपकडून उमेदवारी! पंचवटी प्रभागातून आणखी कुणाला संधी?

याशिवाय, महाविकास आघाडी (Mahavikas Aaghadi) काही ठिकाणी मनसेसोबत काम करत आहे, तर काँग्रेसने देखील काही ठिकाणी स्वतंत्र उमेदवार मैदानात उतरवले आहेत. या परिस्थितीमुळे प्रभागानुसार तिरंगी लढती आणि संकुचित संघर्षाचे दृश्य दिसून येत आहे. मंगळवारी दिवसभर निवडणूक निर्णय अधिका-यांच्या देखरेखीखाली उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात आले. उमेदवारांसह त्यांच्या समर्थकांनी कार्यालयांमध्ये मोठी गर्दी केली, परंतु प्रशासनाकडून सुरक्षा आणि सुव्यवस्थेच्या सर्व उपाययोजना प्रभावी पद्धतीने राबवण्यात आल्या.

आज छाननी

आज (दि.३१) आलेल्या अर्जाची छाननी होणार आहे तर दि. २ जानेवारी पर्यंत माघारी होऊन त्या नंतर अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.

ताज्या बातम्या

अत्याचार

त्या नराधमाला पाहताच चिमुकली घाबरुन पालकांच्या मागे लपली; बदलापूरात पुन्हा चिमुकलीवर...

0
बदलापूर | Badlapurबदलापूरमध्ये पुन्हा एकदा शाळेतील लहान मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. एका चार वर्षांच्या मुलीसोबत शाळेच्या बसमध्ये हे कृत्य...