Friday, September 11, 2026
Homeमुख्य बातम्याNashik NMC News : निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदाराला आयुक्त मनीषा खत्री यांचा...

Nashik NMC News : निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदाराला आयुक्त मनीषा खत्री यांचा दणका; वेद मंदिरासमोरील काँक्रीट रस्ता जेसीबीने फोडला

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

निकृष्ट दर्जाचे काम (Poor Work) करणाऱ्या ठेकेदाराविरोधात नाशिक महापालिकेने (Nashik NMC) धडक कारवाई करत वेद मंदिरासमोरील नव्याने बांधण्यात आलेला काँक्रीट रस्ता जेसीबीच्या साहाय्याने फोडण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे, महापालिका आयुक्त मनीषा खत्री स्वतः उपस्थित राहून कारवाईवर देखरेख ठेवत असल्याने संबंधित ठेकेदाराला मोठा दणका बसला आहे.

- Advertisement -

रस्त्याच्या गुणवत्तेबाबत तक्रारी आणि प्राथमिक तपासणीत निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. आयुक्त मनीषा खत्री (Manisha Khatri) यांच्या निर्देशानुसार सदोष काम स्वीकारण्यास स्पष्ट नकार देत संबंधित भागाचा रस्ता तातडीने फोडण्याचे आदेश देण्यात आले.

दरम्यान, कारवाईच्या (Action) वेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, शहर अभियंता संजय अग्रवाल, बांधकाम विभागाचे संदेश शिंदे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित आहे. निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदाराविरोधात पुढील प्रशासकीय कारवाईही केली जाणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त यांनी दिली.

ताज्या बातम्या

टिप्पर

Nashik Crime News: नाशकात लेडी ब्लॅकमेलरची दहशत; सीएला तब्बल १० लाखांचा...

0
नाशिक | प्रतिनिधीआर्थिक फसवणूक व्यवहारातून आणि त्यानंतर पोलिसांत खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्याची धमकी देत सीए (चार्टर्ड अकाउंटंट) कडून लाखोंची खंडणी उकळणाऱ्या एका हायप्रोफाईल महिलेचा पराक्रम...