नाशिक | Nashik
आल्या शहरातील खड्ड्यांमुळे (Potholes) सहा जणांचा बळी गेल्यानंतर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी खड्ड्यांबाबत आढावा घेतल्यानंतर महापालिका आयुक्त मनीषा खत्री (Manisha Khatri) अॅक्शन मोडवर ल्या अढसून खड्ड्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी बांधकाम विभागातील पाच कार्यकारी अभियंत्यांसह एकूण १३ अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
संबंधितांना खुलासा सादर करण्यासाठी सात दिवसांची मुदत देण्यात आली असून, समाधानकारक खुलासा न केल्यास थेट राज्य शासनाकडे (State Government) अहवाल पाठविण्याचा इशारा नोटिसीत देण्यात आला आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांसह पावसाम ळे शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. खड्ड्यांच्या प्रश्नावर नागरिकांम ध्ये तीव्र संताप व्यक्त होत असताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी गेल्या आठवड्यात मुंबईत तातडीची बैठक घेऊन शहरातील खड्डे तातडीने बुजविण्याचे निर्देश दिले होते.
यानंतर झालेल्या विशेष महासभेत (Mahasabha) नगरसेवकांनीही प्रशासनाला धारेवर धरत जीवघेण्या खड्ड्यांसाठी महापालिकेसह स्मार्ट सिटी आणि एमएनजीएलच्या कामांवर प्रश्न उपस्थित केले होते. महासभेत दिलेल्या आश्वासनानंतरही खड्डे बुजविण्याच्या कामाला अपेक्षित गती न आल्याने आयुक्तांनी संबंधित अभियंत्यांवर थेट कारवाईचा बडगा उगारला आहे. नागरिक आणि लोकप्रतिनिधींकडून वारंवार तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष झाल्याचे निदर्शनास आल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे समजते. आयुक्तांच्या या कठोर भूमिकेमुळे महापालिकेच्या बांधकाम विभागात खळबळ उडाली असून, खड्डे बुजविण्याच्या कामाकडे आता अभियंत्यांचे लक्ष लागले आहे.
शहरातील खड्ड्यांबाबत नागरिक आणि लोकप्रतिनिधींच्या तक्रारींकडे दुर्लक्ष खपवून घेतले जाणार नाही. संबंधित अभियंत्यांनी सात दिवसांत समाधानकारक खुलासा सादर करावा. अन्यथा अहवाल राज्य शासनाकडे पाठवून पुढील कारवाई केली जाईल.
मनीषा खत्री, आयुक्त, मनपा, नाशिक




