Tuesday, May 26, 2026
HomeनाशिकNashik NMC News : आयुक्त खत्रींच्या निर्देशानुसार महापालिकेतील अधिकार्‍यांच्या कार्यभारात फेरबदल

Nashik NMC News : आयुक्त खत्रींच्या निर्देशानुसार महापालिकेतील अधिकार्‍यांच्या कार्यभारात फेरबदल

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक महानगरपालिकेत (Nashik Municipal Corporation) प्रशासकीय कामकाज अधिक सुसूत्र करण्याच्या उद्देशाने उपआयुक्त संवर्गातील अधिकाऱ्यांच्या कार्यभारात व्यापक फेरबदल करण्यात आला आहे. आयुक्त मनिषा खत्री (Manisha Khatri) यांच्या निर्देशानुसार हा आदेश जारी करण्यात आला असून, तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

- Advertisement -

नवीन आदेशानुसार अजित निकत (Ajit Nikat) यांच्याकडे कर विभाग (स्थानिक संस्था कर, घरपट्टी, पाणीपट्टी) तसेच मिळकत विभागाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. सुवर्णा दखणे यांच्याकडील कर व मिळकत विभाग निकत यांच्याकडे हस्तांतरित करण्यात आले असून दखणे यांच्याकडे अतिक्रमण विभाग, जाहिरात व परवाना विभाग, माहिती व तंत्रज्ञान विभाग, रोफेधो, सुरक्षा विभाग, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान (एनयूएलएम) व स्लम विभागाचा कार्यभार देण्यात आला आहे. संगिता नांदुरकर यांच्याकडील अतिक्रमण व माहिती तंत्रज्ञान विभागाचा कार्यभारही पुढील आदेश होईपर्यंत सुवर्णा दखणे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

दरम्यान, घनकचरा व्यवस्थापन विभागाचा कार्यभार तात्पुरत्या स्वरूपात वैद्यकीय अधिकारी डॉ. आवेश पलोड यांच्याकडे देण्यात आला आहे. आदेशात स्पष्ट नमूद करण्यात आले आहे की, संबंधित अधिकाऱ्यांनी सर्व प्रशासकीय कागदपत्रे, महत्त्वाच्या टिपण्या, किल्ल्या, संगणकीय आयडी व ई-प्रणालीचे पासवर्ड अधिकृत नोंदीसह हस्तांतरित करावेत. आदेशाची नोंद सेवा पुस्तकात घेण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. महापालिकेतील विविध संवेदनशील विभागांत (Departments) झालेल्या या खांदेपालटामुळे प्रशासनात अधिक समन्वय व वेग येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

ताज्या बातम्या

MLC Election : विधान परिषदेसाठी 9 जणांनी नेले 16 उमेदवारी अर्ज

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सोमवारपासून सुरू झाली आहे. या निवडणुकीसाठी पहिल्या दिवशी काल 9 इच्छुकांनी 16 उमेदवारी...