Friday, September 11, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik NMC News : खड्ड्यांच्या मुद्द्यावरून आयुक्त दालनाबाहेर ठाकरे- शिंदे सेनेच्या पदाधिकार्‍यांमध्ये...

Nashik NMC News : खड्ड्यांच्या मुद्द्यावरून आयुक्त दालनाबाहेर ठाकरे- शिंदे सेनेच्या पदाधिकार्‍यांमध्ये शाब्दिक वाद

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक शहर आणि परिसरातील खड्ड्यांच्या गंभीर प्रश्नावरून नाशिक महापालिकेत (Nashik NMC) राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आज (गुरुवारी) महापालिका आयुक्त दालनाबाहेर शिवसेनेचे शिंदे आणि ठाकरे (Shinde and Thackeray Group) गट आमनेसामने आले. यावेळी दोन्ही गटांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये खड्ड्यांच्या मुद्द्यावरून जोरदार शाब्दिक वाद झाला.

- Advertisement -

शिवसेना (शिंदे गट) महानगरप्रमुख तथा नगरसेवक प्रवीण तिदमे (Pravin Tidme) हे खड्ड्यांमुळे अपघातात बाधित झालेल्या कोतकर कुटुंबियांना सोबत घेऊन आयुक्त मनीषा खात्री यांची भेट घेण्यासाठी आले होते. मात्र आयुक्त दालनात उपस्थित नसल्याने तिदमे यांनी दूरध्वनीवरून कोतकर कुटुंबाचा आयुक्तांशी संवाद साधून दिला. त्यानंतर तिदमे आयुक्त दालनाबाहेर या विषयावर पत्रकार परिषद घेत होते.

त्यावेळी शिवसेना (ठाकरे गट) गटनेते केशव पोरजे (Keshav Porje) हे आपल्या समर्थक नगरसेवकांसह अचानक तेथे पोहोचले. यावेळी त्यांनी तिदमे यांना उद्देशून “तुम्ही स्वतः सत्तेत आहात, तरीही तुम्हाला खड्ड्यांच्या प्रश्नावर आंदोलन करावे लागत आहे. त्यापेक्षा सत्ता सोडा; आपण दोघेही एकत्र रस्त्यावर उतरून प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांच्या विरोधात लढा देऊ असे म्हटले. त्यावरून दोघांमध्ये जोरदार बाचाबाची आणि शाब्दिक चकमक झाली. त्यामुळे वातावरण काही काळ तणावपूर्ण बनले होते.

दरम्यान, दोन्ही नेत्यांमधील वाद विकोपाला जात असल्याचे पाहून बाळा दराडे (Bala Darade) यांनी तत्परतेने मध्यस्थी केली. त्यांनी दोन्ही बाजूंच्या पदाधिकाऱ्यांना शांत करत वाद मिटवला. खड्ड्यांच्या मुद्द्यावरून प्रत्यक्ष रस्त्यावरील खड्डे भरण्याऐवजी महापालिकेत रंगलेले हे राजकीय नाट्य सध्या शहरात चर्चेचा विषय ठरत आहे.

ताज्या बातम्या

धडक

मजूरांसाठी काळरात्र ठरली! भरधाव ट्रकची पिकअपला जोरदार धडक; ८ जणांचा जागीच...

0
भंडारा | Bhandaraगोंदिया-बालाघाट मार्गावर नागरा-मोहरानटोली परिसरात ट्रक आणि प्रवासी पिकअप वाहनाची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत ८ जणांचा जागीच मृत्यू...