Thursday, August 20, 2026
HomeनाशिकNashik NMC News : अंदाजपत्रकीय महासभेत गोंधळ; विरोधकांकडून महापौरांचा 'राजदंड' पळवण्याचा प्रयत्न

Nashik NMC News : अंदाजपत्रकीय महासभेत गोंधळ; विरोधकांकडून महापौरांचा ‘राजदंड’ पळवण्याचा प्रयत्न

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

महापालिकेच्या (Municipal Corporation) अंदाजपत्रकीय महासभेत आज (सोमवारी) विरोधकांच्या आक्रमक भूमिकेमुळे काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांच्या सिडकोतील स्मारकासाठी अंदाजपत्रकात (Budget) आर्थिक तरतूद करावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नगरसेवकांनी सभागृहात ठिय्या आंदोलन केले. दरम्यान, निधीच्या तफावतीच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेनेही पोस्टरबाजी करत सत्ताधाऱ्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे सभागृहात एकच गोंधळ उडाला.

- Advertisement -

या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर काही विरोधी नगरसेवकांनी (Corporators) महापौरांचा (Mayor) ‘राजदंड’ पळवण्याचा प्रयत्न केल्याने परिस्थिती अधिकच चिघळली. प्रशासन आणि सुरक्षारक्षकांनी तातडीने हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यामुळे काही काळासाठी सभा स्थगित करण्यात आली होती. यानंतर परिस्थिती निवळल्यावर सभा पुन्हा सुरू करण्यात आली. या प्रकारामुळे सभागृहाच्या शिस्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, राजकीय वातावरण तापल्याचे चित्र दिसून आले.

मूळ अंदाजपत्रक सादर

सन २०२६-२०२७ या आर्थिक वर्षासाठी रुपये १४३.०९ कोटी आरंभिच्या शिल्लकीसह रुपये ३४६९.१३ कोटी जमेचे व रुपये ३४६७.२८ कोटी खर्चाचे मूळ अंदाजपत्रक सादर महासभेत सादर करण्यात आले.

ठाकरे आणि अजित पवार गटाचे नगरसेवक आक्रमक

महापालिकेत समान निधी वाटप होत नसल्याच्या मुद्द्यावरून ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी पोस्टर हातात घेत सभागृहात घोषणाबाजी केली. यावेळी ‘विरोधकांना निधी अर्धा देत असाल तर नागरिकांचा कर देखील अर्धा करा’, जनतेच्या पैशात भेदभाव आम्हाला मान्य नाही, मनपाची मनमानी चालणार नाही, अशा आशयाचे पोस्टर झळकावत निषेध केला. तर अजित पवार गटाच्या नगरसेवकांनी अजित पवारांच्या स्मारकासाठी अंदाजपत्रकात तरतूद करावी, अशी मागणी केली.

ताज्या बातम्या

जिल्हा वार्षिक योजनेतील कामे युद्ध पातळीवर पूर्ण करावेत – पालकमंत्री गिरीश...

0
नाशिक, दि. १९ ऑगस्ट (जिमाका वृत्तसेवा) नाशिक त्र्यंबकेश्वर येथे पुढील वर्षी सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून होणारी विविध विकास...