Saturday, May 4, 2024
Homeनाशिकनाशिक मनपाने घडवली विद्यार्थ्यांना खगोलशास्त्राची सफर

नाशिक मनपाने घडवली विद्यार्थ्यांना खगोलशास्त्राची सफर

नाशिक | Nashik

विद्यार्थ्यांना खगोलशास्त्र, टेलिस्कोपी आणि खगोल भौतिकशास्त्र तज्ज्ञांकडून शिकण्याची, थेट संवाद साधण्याची आणि आकाशाचा शोध घेण्याची संधी मिळावी यासाठी नाशिक मनापा (nmc) ने एक उपक्रम राबविला. याअंतर्गत नाशिक महानगरपालिकेकडून कार्यान्वित असलेल्या ‘नाशिक डिस्ट्रिक्ट टिंकरिंग लॅबोरेटरी’ने (NDTL) विद्यार्थ्यांसाठी खगोलशास्त्रावर (astronomy) एक मायक्रोकोर्स त्र्यंबकरोडवरील एस्पॅलियर हेरिटेज स्कूल येथे आयोजित केला होता.

- Advertisement -

यामध्ये स्टॉकहोम विद्यापीठातील तरुण खगोलभौतिक शास्त्रज्ञ डॉ कुणाल देवरस यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधत विद्यार्थ्यांना खगोलीय वस्तू आणि घटनांचा मानवी जीवनावर कसा परिणाम होतो,  खगोल भौतिकशास्त्र का महत्वाचे याबाबत माहिती दिली.

याबरोबरच इस्रो प्रमाणित अंतराळ शिक्षण संस्था असलेली कल्पना युथ फाऊंडेशनचे  (केवायएफ) हेमंत आढाव यांनी टेलिस्कोपचे  (telescope) घटक, वैज्ञानिक तत्त्वे आणि अभियांत्रिकी याविषयी माहिती दिली.

तर, खगोल छायाचित्रण (Astrophotography) तज्ज्ञ नितीन धवले यांनी खगोल छायाचित्रणासाठी त्र्यंबकेश्वर जवळ त्यांनी आपली स्वतःची ऑब्सर्वेटरी बनवली आहे त्यांनी देखील स्वतः टिपलेल्या खगोलीय वस्तू आणि घटनांच्या अनेक चित्रांसह निरीक्षण आणि खगोल छायाचित्रण यातील फरक स्पष्ट केले. यामूळे विद्यार्थी आणि पालक यांना  खगोलशास्त्राची ओळख होण्यास मदत झाली.

- Advertisment -

ताज्या बातम्या