नाशिक | प्रतिनिधी | Nashik
मनपाला (NMC) मागणीप्रमाणे जिल्हा प्रशासनाकडून ६,३०० दशलक्ष घनफूट पाणी मिळणार आहे. त्याचप्रमाणे यंदा मान्सून देखील वेळेवर दाखल होण्याचा अंदाज आहे. दरम्यान शहराला ३१ जुलैपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा उपलब्ध असल्याचा दावा मनपा पाणीपुरवठा विभागाकडून (Municipal Water Supply Department) करण्यात आला आहे.
शहरात (City) कुठे पाणी टंचाईची परिस्थिती निर्माण झाल्यास त्यासाठी प्रत्येक विभागात दोन याप्रमाणे १२ टैंकर तयार ठेवण्यात आले आहे. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात (Gangapur Dam) सध्या सुमारे ४१ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. महापालिकेच्या मागणीनुसार ६ हजार ३०० दशलक्ष घनफूट पाणी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे शहरावर पाणी कपातीची वेळ येणार नाही. तरी नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा, असे आवाहन मनपाच्या बतीने करण्यात आले आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये उन्हाळ्याच्या काळात नाशिककरांना (Nashik) पाणी कपातीच्या समस्येला सामोरे जावे लागले होते. मात्र, यदा चांगल्या पर्जन्यमानामुळे गंगापूर धरणातील जलसाठा समाधानकारक आहे. नाशिक महानगरपालिकेला दररोज पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा करता येणार आहे. शहरातील काही भागांमध्ये नैसर्गिक व तांत्रिक कारणांमुळे कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. त्यासाठी महापालिके ने प्रत्येक विभागात टैंकरची व्यवस्था ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, पाणी गळती आणि गैरवापर टाळण्यासाठी कठोर पावले उचलली जाणार आहेत.
चर खोदण्याची गरज
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातील सध्याची जलपातळी ६१२.३५ मीटर इतकी आहे. यंत्रणेद्वारे धरणातून ५९८ मीटर पातळीपर्यंत पाणी उचलता येते. त्यानंतर धरणात ६०० दशलक्ष घनफूट मृतसाठा शिल्लक असतो. जून तसेच जुलै महिन्यात जलसंकटाच्या कालावधीत मृतसाठा नाशिककरांना पिण्यासाठी पुरेसा आहे. त्यासाठी चर खोदून ४५० दशलक्ष घनफूट पाणीसाठा उचलता येणार आहे. चर खोदण्याच्या कामासाठी मनपाने सल्लागार नेमला असून लवकरच त्याचा अहवाल प्राप्त होगार आहे. त्यानंतर पावसाळ्यात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असून त्यासाठी मनपाने १२ कोटी रुपयांची तरतूद करून ठेवलेली आहे.
३१ जुलैपर्यंत शहराला पाणी पुरेल एवढा पाणीसाठी आहे. जुलैपर्यंत पाऊस पडतोच. जर पाऊस वेळेवर आला नाही व जास्त उशीर झाला तरच संकट येऊ शकतो, अन्यथा नाही. तरी नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा.
- रवींद्र धारणकर, अधीक्षक, पाणीपुरवठा