Saturday, May 4, 2024
Homeमुख्य बातम्यामहामंडळाचे शहरातील बसस्थानकं मनपा भाड्याने घेणार?

महामंडळाचे शहरातील बसस्थानकं मनपा भाड्याने घेणार?

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक महानगरपालिका (Nashik NMC) सिटीलिंक (Citilinc Bus) बससेवेला होत असलेला तोटा कमी करण्यासाठी महापालिका प्रशासन विविध उपाययोजनांवर विचार करीत आहे…

- Advertisement -

त्याचाच एक भाग म्हणून राज्य परिवहन महामंडळाच्या (MSRTC) मालकीच्या असलेल्या पंचवटीतील निमाणी, नाशिकरोड आणि भगूर येथील बसस्थानकांचा महापालिकेच्या नाशिक सिटीलिंकच्या बसेसकरिता भाडेतत्वावर वापर करण्याचा विचार केला जात आहे.

उद्या (दि. २१) राज्य परिवहन महामंडळ तसेच महापालिकेच्या स्मार्ट सिटीचे (Smart City) अधिकारी संयुक्तपणे जागेची पाहणी करून चर्चा करणार असल्याचे समजते. जागेचे भाडेनिश्चित झाले तर या बसस्थानकांची जागा शहर बस वाहतूक सेवेला वापरासाठी देण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.

Visual Story : अलविदा! फिरकीच्या जादुगाराला अखेरचा निरोप

राज्य परिवहन महामंडळाने (MSRTC) शहर बस वाहतूक सेवा कायमस्वरूपी बंद केली आहे. त्यानंतर 8 जुलै 2021 पासून महापालिकेच्या माध्यमातून शहरात नागरिकांना उत्तम दर्जाची शहर बस सेवा मिळत आहे.

मनपाच्या (NMC) सिटीलिंक कंपनीच्या द्वारे एकूण 168 बसेस चाळीस रुटवर सध्या धावत आहे. आतापर्यंत सुमारे 20 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई महापालिकेच्या बससेवेने केली आहे.

Visual Story : मोस्ट अवेटेड ‘KGF Chapter 2’ चे गाणे ‘या’ दिवशी होणार रिलीज

एकीकडे चांगली कमाई होत असली तरी दुसरीकडे तोटादेखील वाढत आहे. आतापर्यंत सुमारे दोन कोटी रुपयांचा तोटा नाशिक महापालिकेच्या बस सेवेला (Nashik NMC Bus Service) पडला आहे. महापालिका विविध प्रकारची सेवा नागरिकांना देते त्याच पद्धतीची बस सेवा आहे. त्यात तोटा जरी आला तरी सेवा उपलब्ध राहणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या