Thursday, September 24, 2026
HomeनाशिकNashik Onion News : "रॅकमध्ये सडका अन् खराब..."; लासलगाव स्थानकात 'कांदा एक्सप्रेस'...

Nashik Onion News : “रॅकमध्ये सडका अन् खराब…”; लासलगाव स्थानकात ‘कांदा एक्सप्रेस’ रोखत प्रहारच्या निंबाळकरांचा गंभीर आरोप

नेमकं काय म्हणाले?

लासलगाव | वार्ताहर | Lasalgoan

देशांतर्गत बाजारात कांद्याचे दर ६० ते ७० रुपये प्रति किलोवर पोहोचल्याने ग्राहकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने (Central Government) बफर स्टॉकमधून कांदा पुरवठा सुरू केला आहे. याचाच एक भाग म्हणून नाफेड आणि एनसीसीएफच्या वतीने लासलगाव रेल्वे स्थानकातून दिल्लीसाठी मालगाडीची व्यवस्था करण्यात आली. मात्र, आधीच सोपस्कार आणि पॅकिंगअभावी १६ तास रखडलेली ही मालगाडी अखेर बुधवारी रवाना होण्याच्या तयारीत असतानाच प्रहार संघटनेचे गणेश निंबाळकर (Ganesh Nimbalkar) यांनी अचानक मालधक्क्यावर येऊन कांदा एक्सप्रेस रोखून धरली आहे. त्यांनी रॅकमध्ये सडका आणि खराब कांदा पाठविला जात असल्याचा आरोप करीत एनसीसीएफच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले आहे.

- Advertisement -

यावेळी निंबाळकर यांनी आक्रमक भूमिका घेत रेल्वे गाडीसमोर (The Train) बसून आंदोलन केले. हा कांदा दोन दिवसांत पूर्णपणे खराब होईल आणि यामुळे खुल्या बाजारातील शेतमालाचे भाव पडतील, असा पवित्रा त्यांनी घेतला. या प्रकारामुळे लासलगाव रेल्वे मालधक्क्यावर सुमारे एक तास मालगाडी रखडली. घटनेची माहिती मिळताच आरपीएफचे अधिकारी आणि लासलगाव पोलीस ठाण्याच्या (Lasalgaon Police Station) पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आंदोलकांना बाजूला केले. मात्र निंबाळकर आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने मालधक्क्यावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. या आंदोलनामुळे ‘कांदा एक्सप्रेस’ एक तास लासलगाव स्थानकातच थांबून होती. अखेर तीन वाजेच्या सुमारास मालगाडी दिल्लीकडे रवाना झाली.

शेतकऱ्यांचा संताप

दरम्यान, केंद्र सरकारने हा कांदा केवळ दिल्लीपुरता (Delhi) मर्यादित न ठेवता कलकत्ता, गुवाहाटी, चेन्नई आणि कोचीन या प्रमुख महानगरांमध्येही पाठविण्याची तयारी सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, या कारवाईमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून, उत्पादक शेतकऱ्यांच्या कष्टाच्या मालाला योग्य भाव मिळण्याऐवजी अशा प्रकारे सडका कांदा पाठवून बाजार पाडण्याचे प्रयत्न सुरू राहिल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

ताज्या बातम्या

Rahata : राहाता बाजार समितीत डाळिंबाची आवक; वाचा भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata बुधवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) डाळिंबाला प्रतिकिलोला 305 रुपये भाव मिळाला. डाळिंबाच्या (Pomegranate) 4734 कॅरेटची आवक झाली. डाळिंब नंबर...