Sunday, April 27, 2025
Homeक्रीडाप्रो-कबड्डी : 'पुणेरी पलटण' गाजवणार नाशिकचा 'आकाश'

प्रो-कबड्डी : ‘पुणेरी पलटण’ गाजवणार नाशिकचा ‘आकाश’

नाशिक | प्रतिनिधी Nashik

प्रो-कबड्डीच्या आठव्या हंगामासाठी (pro kabaddi season 8) नाशिक मधील आडगावचा राष्ट्रीय कबड्डी खेळाडू (National Kabaddi player) आकाश संतोष शिंदे (Akash Santosh Shinde) याची न्यू यंग प्लेअर म्हणून पुणेरी पलटन (Puneri Paltan) या संघात निवड झाली आहे….

- Advertisement -

आकाशने खूप कमी वयात म्हणजे वयाच्या विसाव्या वर्षी या स्पर्धेत सहभागी होण्याचा मान मिळवला आहे. पुणेरी पलटन या संघात आकाशची निवड झाल्याची बातमी कळताच आडगाव मधील खेळाडू, कबड्डी प्रेमीनीं फटाके फोडून, गुलाल उधळून, पेढे वाटुन आनंद साजरा केला.

आडगाव हे महानगरपालिका क्षेत्रातील गाव असून या गावाला कबड्डी खेळाची मोठी परंपरा इथे आहे. अनेक वर्षांपासून कबड्डी हा खेळ येथे खेळाला जातो. तसेच कबड्डी खेळाच्या माध्यमातून अनेक खेळाडू या ठिकाणी तयार झालेले आहेत.

आकाशला बालपणापासूनच कबड्डी या खेळाची आवड निर्माण झाली. शालेय जीवनापासूनच तो कबड्डी खेळाकडे आकर्षित झाला. शालेय कबड्डी स्पर्धेच्या वेळेस आकाशचे खेळातील कौशल्य पाहून ब्रम्हा स्पोर्ट्स क्लब चे अध्यक्ष सागर माळोदे, प्रशिक्षक प्रा. संतोष जाधव व प्रा.विनोद लभडे यांनी आकाश मधील कौशल्य ओळखली व पुढे प्रा. संतोष जाधव व प्रा. विनोद लभडे यांच्या मार्गदर्शनाखाली कबड्डीतील कौशल्य, तंत्र व बारकावे विकसित झाली.

नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीने खेळविल्या जाणाऱ्या किशोर गट निवड चाचणी स्पर्धेत त्याने जिल्ह्याचे अजिंक्यपद पटकावले व प्रथमतः त्याची नाशिक जिल्ह्याच्या संघातून महाराष्ट्र राज्य किशोरगटनिवड चाचणी स्पर्धेत निवड झाली.

आकाशच्या कबड्डी खेळाच्या प्रवासाला सुरुवात झाली ती ब्रम्हा स्पोर्ट्स क्लब आडगाव यांच्या माध्यमातून यानंतर आकाशने कधीही मागे वळून पहिले नाही व यशाची अनेक शिखरे त्याने पदकांत केली.

आकाशने आपल्या खेळातील कर्तबगारीने निर्माण केलेले कबड्डी खेळातील योगदान बघितले तर प्रत्येकाला अभिमान वाटेल असे आहे आकाशने खालील प्रमाणे क्रीडा स्पर्धेत आपला सहभाग नोंदविला आहे.

आकाशची कामगिरी

२०२० वरिष्ठ गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्याच्या सराव शिबिरास निवड

२०१९-२० रोहतक हरियाणा येथे झालेल्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व केले. महाराष्ट्र राज्यासाठी सर्वाधिक गुण मिळवणारा खेळाडू ठरला. त्याच्या या कामगिरीच्या जोरावर त्याची ज्युनिअर एशियन चॅम्पियनशिप साठी भारतीय संघाच्या सराव शिबिरास निवड झाली.

२०१९-२० दक्षिण विभागीय आंतर विद्यापीठ कबड्डी स्पर्धा – कोटा राजस्थान पुणे विद्यापीठाच्या संघात निवड

२०१९-२० अश्वमेध क्रीडा स्पर्धा – सोलापूर महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सव २०१९-२० साठी पुणे विद्यापीठाच्या संघात निवड

२०१८-१९ १९ वर्षाआतील शालेय राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा दिल्ली महाराष्ट्र संघ प्रतिनिधित्व

२०१९-१९ १९ वर्षाआतील शालेय राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा बीड – सुवर्ण पदक विजेता

२०१९-२० महाराष्ट्र राज्य वरिष्ठ गट निवड चाचणी स्पर्धा -रत्नागिरी

२०१८-१९ महाराष्ट्र राज्य वरिष्ठ गट निवड चाचणी स्पर्धा – नाशिक

२०१९-२० महाराष्ट्र राज्य कुमार गट निवड चाचणी स्पर्धा – बीड

२०१८-१९ महाराष्ट्र राज्य कुमार गट निवड चाचणी स्पर्धा – परभणी

२०१७-१८ महाराष्ट्र राज्य कुमार गट निवड चाचणी स्पर्धा – सांगली

२०१६-१७ महाराष्ट्र राज्य किशोर गट निवड चाचणी स्पर्धा – पुणे

२०१५-१६ महाराष्ट्र राज्य किशोर गट निवड चाचणी स्पर्धा – सांगली

२०१४-१५ महाराष्ट्र राज्य किशोर गट निवड चाचणी स्पर्धा – सोलापूर

२०१३-१४ १४ वर्षाआतील राज्यस्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा – वाशीम

२०१८-१९ मध्ये नाशिक (सिन्नर) येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य वरिष्ठ गट निवड चाचणी स्पर्धेसाठी नाशिक जिल्हा संघाचे प्रशिक्षक असलेले शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेतेश्री. सागर बांदेकर यांनी आकाशचे खेळातील कौशल्य बघून महिंद्रा आणि महिंद्रा या व्यवसायिक संघात त्याची निवड केली त्यांच्या मार्गदर्शनाखाली तो खेळू लागला मागील वर्षी पासून तो युवा पलटण या व्यवसायिक संघातून खेळतो.

आकाशला प्रो-कबड्डी पर्यंतच्या या खडतर प्रवासात इथपर्यंत पोहोचण्याची खरी ताकद मिळाली ती त्याचे वडील संतोष शिंदे व शिंदे परिवार तसेच ब्रम्हा स्पोर्ट्स क्लब चे अध्यक्ष सागर माळोदे प्रशिक्षक प्रा. संतोष जाधव व प्रा. विनोद लभडे व ब्रम्हा स्पोर्ट्स क्लब मधील सर्व खेळाडू, पदाधिकारी यांच्याकडूनच. आकाशने नेहमी फिटनेसला महत्व दिले. तसेच कबड्डी खेळाबरोबर त्याने अभ्यासाला महत्व दिले आहे. तो सध्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय सुरगाणा येथे कला शाखेच्या दुसऱ्या वर्गाला शिकत आहे.

कबड्डी खेळाला जीवनाचा अविभाज्य घटक मानून लाल मातीच्या मैदानात खेळणारा आकाश एक दिवस यशाच्या उतुंग शुक्रवार पोहोचेल असा विश्वास ठेवणाऱ्या त्याच्या पित्याचे स्वप्न आज खरे ठरले आहे. आडगावच्या मातीतील खेळाफडुबे देशपातळीवर नाव उंचावल्यामुळे आकाशच्या घरी शुभेच्छा देण्यासाठी मोठो गर्दी होत आहे. देशाचा अभिमान बाळगा, मोठ्यांचा सन्मान करा,तरुणांनी स्वतःची ध्येये निश्चित केली पाहिजे, निर्व्यसनी राहायला हवे, खेळात करिअर करता येते आवड व क्षमता निर्माण करा खेळात सातत्य राखा प्रचंड मेहनत करायला शिका यश तुमच्या जवळ नक्की येईल असे आकाशचे वडील भरभरून सांगत होते.

बालपणापासूनच शाळेच्या मैदानात आपल्या खेळाचा करिष्मा दाखवणाऱ्या आडगावच्या आकाश शिंदेने आवड, क्षमता, सातत्य, संधी व खेळाशी प्रामाणिकपणा यांच्या जोरावर अखेर त्याने प्रो-कबड्डी मध्ये गरुडझेप घेतली आहे. या कामगिरीने जनतेच्या मनात कबड्डी खेळाविषयी व त्याच्या विषयी आदराचे स्थान निर्माण झाले आहे त्याच्या या विलक्षण यशाने समस्त आडगावकरांची मान अभिमानाने उंचावलेली आहे.

आणखीही ताज्या बातम्या वाचण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनल जॉईन करा इथे

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

वकिलांनी कायदेशीरदृष्ट्या अद्ययावत रहावे – न्या. जैन

0
नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad गतिमान न्यायदान करताना वकिलांनी चौकस राहून वेळोवेळी कायद्यात होणार्‍या बदलांचा सखोल अभ्यास करावा व अद्ययावत राहावे, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे...