Tuesday, May 21, 2024
HomeनाशिकDeshdoot Special : ड्रग्ज प्रकरण पोलीस आयुक्तांना भोवणार? बदलीची चर्चा; राजकारण जोरात,...

Deshdoot Special : ड्रग्ज प्रकरण पोलीस आयुक्तांना भोवणार? बदलीची चर्चा; राजकारण जोरात, ठाकरे गटाचा मोर्चा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक शहरात (Nashik City) मोठ्याप्रमाणात एमडी ड्रग्ज मिळत असून त्यामुळे तरुण पिढी बर्बाद होत आहे, अशी चर्चा मागील काही वर्षापासून सुरू होती. तर शहरातील जवळपास सर्व मनपा उद्यानांसह अनेक झोपडपट्यांमध्ये असे नशेचे साहित्य मिळत असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे (Police) करण्यात आल्या होत्या. मात्र, त्याची पाहिजे तशी गंभीर दखल घेण्यात आलेली नव्हती. मागच्या आठवड्यात मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) नाशिकमध्ये (Nashik) येऊन ड्रग्ज तयार करण्याच्या कारखान्यावर छापा (Raid) टाकून कारवाई केल्याने हा मुद्दा आता राज्यस्तरीय झाला असून तो पोलीस आयुक्तांना (Commissioner of Police) भोवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच त्यांच्या बदलीची देखील चर्चा सुरू झाली आहे….

- Advertisement -

Accident News : समृध्दी महामार्गावरील अपघातातील मृतांची नावे आली समोर

राज्यात सध्या विविध विषयांवर राजकारण जोरात होत आहे. त्यात आता नाशिकचा एमडी ड्रग्जचा (MD Drugs) मुद्दा मोठ्या प्रमाणात गाजत आहे. सत्ताधार्‍यांना घेरण्यासाठी विरोधीपक्षांनी थेट पालकमंत्र्यांना (Guardian Minister) लक्ष्य केले असून त्यांच्याच आशिर्वादाने ड्रग्जचा अड्डा सुरू होता, असा आरोप करण्यात येत आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या (ShivSena Thackeray Group) नेत्या सुषमा अंधारे यांनी देखील यात उडी घेऊन आरोपांच्या फैरी झाडल्या तर पुण्यापासून सुरू झालेली ड्रग्जची कडी नाशिकला (Nashik) येऊन संपणार असे वाटते. पुण्याचे कॉंग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकर (MLA Ravindra Dhangekar) यांनी देखील सत्ताधार्‍यांना यात घेरले आहे. तर ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी येत्या २० ऑक्टोबरला नाशिकमध्ये मोर्चा काढण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे हे प्रकरण लवकर शांत होणार नसल्याची चिन्हे दिसत असून यामध्ये कोणाचा बळी जाणार अशी चर्चा सुरु आली. यात नाशिकचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची यामुळे बदली होणार असल्याची देखील चर्चा आहे.

Nashik News : मनसेच्या नाशिक शहराध्यक्षपदी सुदाम कोंबडे यांची नियुक्ती

नाशिक शहरात येऊन मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) धाडसी कारवाई करुन सुमारे ३०० कोटींचा एमडी ड्रग्जचा अड्डा उद्ध्वस्त केला. विशेष म्हणजे नाशिक पोलीस आयुक्तांनी अंमली पदार्थविरोधी स्वतंत्र पथक तयार केलेले असतांना देखील शहरात एवढ्या मोठ्या प्रमाणात नशेचा उद्योग सुरू असल्याचे त्यांच्या लक्षात का आले नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मुंबईच्या साकीनाका पोलिसांनी ड्रग्ज एमडीवर मोठी कारवाई केल्यानंतर नाशिक पोलिसांनाही (Nashik Police) जाग आली. त्यांनीही ड्रग्जसाठी लागणारा कच्चा मालाच्या गोडाऊनवर छापा टाकत कारवाई केली. शिंदे गाव परिसरात ड्रग्जसाठी कच्चामाल पुरविणार्‍या एका गोडाऊनवर नाशिकरोड पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने छापा टाकून कोट्यवधी रुपयांचा माल जप्त केला. मात्र हे गोडावून एका दिवसात येथे आले का, यापूर्वीच पोलिसांना याची कल्पना नव्हती का, जर होती तर कारवाई का करण्यात आली नाही, कोणाचा दबाव पोलिसांवर होता, असे अनेक प्रश्न विचारले जात आहे.

Accident News : समृध्दी महामार्गावरील अपघाताबाबत मुख्यमंत्र्यांकडून दुःख व्यक्त; मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत जाहीर

नाशिक शहरात १३ स्वतंत्र पोलीस ठाण्यांसह गुंडाविरोधी पथक, अंमली पदार्थ विरोधी पथक, खंडणी विरोधी पथक, सायबर पोलीस ठाणे असे विविध अंग आहे. तर गुन्हे शाखांचे दोन युनिट असून दोघांना स्वतंत्र वरिष्ठ पोलीस निरीक्षक दर्जाचे अधिकारी असून असे असतानाही नाशिकमध्ये शेकडो कोटींचा नशेचा धंदा सुरू आहे व ती माहिती पोलिसांना नाही, असे होऊच शकत नाही, असा दावा केला जात आहे. त्यामुळेच पोलीस आयुक्तांवर त्याची गाज पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

अशीही चर्चा

नाशिकचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे हे अत्यंत शिस्तप्रिय अधिकारी मानले जातात. नाशिकचा चार्ज हाती घेतल्यापासून त्यांनी शहरातील सर्व भागातील अवैध धंदे बंद करुन कायदा भंग करणार्‍यांवर थेट कारवाई सुरू केल्याने आपल्याच विभागातील काही अधिकार्‍यांना ते पटलेले नाही. त्यामुळे त्यांची बदली व्हावी, अशी त्यांची देखील भावना असल्याचे बोलले जाते.

Samruddhi Express Way Accident: पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून शोक व्यक्त; मृतांच्या नातेवाईकांना, जखमींना मदत केली जाहीर

- Advertisment -

ताज्या बातम्या